This Ghazal is written in sixteen matras. In this Ghazal we meet various beautiful flowers, butterflies and green nature. When the poetess sees these natural things she becomes very happy. Her imagination blooms like a flower and she wrote this poem or Nisarg kavita.
कमळ होउनी दाल तलावी
लाल परांची परी झुलावी
चिंब पहाटे मुग्ध हसावी
गुलाब गाली खाली खुलावी
धवल पाकळ्या प्राजक्ताच्या
देठ केशरी छत्री व्हावी
लहरत विहरे जास्वंदीही
कर्ण-कुंडले जशी डुलावी
बकुळ फुलांच्या गन्धाश्रूंनी
मातीमध्ये लोळण घ्यावी
सोनटक्याची कळी फुलोनी
चंद्राच्या किरणात नहावी
जांभुळलेली फूलपाखरे
भूचंपक होऊन उडावी
बनुन केवडा बनातील मी
सुगंध भिजली लकेर प्यावी
पायामध्ये बांधुन घुंगुर
कळ्या फुलांनी गाणी गावी
म्हणे सुनेत्रा मनास माझ्या
मृदुल पोपटी किनार यावी