Radif of this ghazal(14 matras) is Gade. In marathi language the word ‘Gade’ is used to call our dear friend or beloved person. In this Ghazal atmosphere in rainy season(Shravan-Bhadrapad months) is described. Kafiyas are Saaj, Aaj, Pkhavaaj etc.
मेघगर्द हा साज गडे
पावसात भिज आज गडे
टाळ वाजविल हा वारा
वाजव तू पखवाज गडे
ढोल ढगांचा गारांचा
झांज होउनी वाज गडे
पडून वाळूवर ऐकू
सागरातली गाज गडे
मोरपीस तू नाजुकसे
तुझा निराळा बाज गडे
श्रावणसर होऊन निळी
उन्हात लाह्या भाज गडे
धरा म्हणाली श्याम नभा
देना हिरवा साज गडे
नको ‘सुनेत्रा’ नको म्हणू
शिरावरी तू ताज गडे