फाल्गुन मासी रिमझिमणाऱ्या
झरती पाऊससरी
झरती पाऊससरी ….
आभाळाच्या आल्या पोरी
नाचत धरेवरी
नाचत धरेवरी…
रिमझिम पाऊससरी
धरेवर आल्या पाऊससरी …
भिजले अंगण भिजल्या वाटा
भिजल्या चिंब सरी
भिजल्या चिंब सरी …
पहाटेस कुणी कचरावेचक
चाले रस्त्यावरी
चाले रस्त्यावरी ….
उचलून कचरा सारा सारा
घरचा रस्ता धरी…
घरचा रस्ता धरी …
वर्दळ वाढत जाई हळुहळु
वेगाने नाचरी …
वेगाने नाचरी….
दिवस सुखाचा मजेत जातो
आनंदाने घरी … आनंदाने घरी….