तरही कविता
कवितेची पहिली ओळ कवी रमेश वाकनीस यांची
मी कोसळणारा पाऊस पहिलावहिला
अंतरी भरूनी हलके झरझरणारा
आषाढ घनातुन संदेश प्रिये तुज देण्या
मी येतो तुझिया नयनांत भराया वारा
पाऊस थबकला बरस बरसला दारी
मेघातुन आला लोळण घेण्या दारी
अक्षरे पेरुनी भूवर मम अंगणी
तो हसतो आहे हिरवेपण लेऊनी
पानांचा पाऊस टपटपे भिजे माधवी
पान फुली उमलून वल्लरी चढे मांडवी
आतुरलेली गतकाळाची आठवण सुकली
चिंब सुगंधी भिजून झाली गर्द सावळी