चहात साखर नाही म्हणुनी – CHAHAT SAKHAR NAHI MHANUNI


This Ghazal is written in matravrutta. It is written in 32 matras. In this Ghazal the poetess says to her beloved person not to become angry if there is no sugar in his tea. She asks him to read her ghazals instead of becoming angry.

चहात साखर नाही म्हणुनी उगिच असा तू चिडतो का रे
पिऊन घे तू गोड माझिया गझलेमधले गुलाब सारे

दु:ख न बुडते वरती येते पंखावरती पेल तया तू
प्याल्यामधले वीष प्राशुनी नकोस पाहू दिवसा तारे

या शब्दांची नशा वेगळी माझ्यासंगे तुला चढावी
माझ्यासम या शब्दफुलांना कवेत घ्यावे तू सजणारे

गझल नव्हे ही हळवे स्पंदन पानावर या हळु थरथरते
नकोस झटकू डोळ्यांवरुनी फिरवून घे या मोरपिसारे

गझल ‘सुनेत्रा’ तुझी बावरी गर्दी मध्ये लपून बसते
पण एकांती बागडते ती भरून मोकळे उरात वारे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.