This Ghazal is written in 28 matras. Radif of this Ghazal is ‘Tya prem mhanu mee kaise.’ kafiyas are Shahane, Bahane, Gane, Diwane etc. In this Ghazal the poetess says, True love means taking experience of love. Only writing and singng songs of love is not true love. Flow of love has no limits.
जे असते अती शहाणे त्या प्रेम म्हणू मी कैसे
वेडाचे फक्त बहाणे त्या प्रेम म्हणू मी कैसे
ऐकते बोलते बघते स्पर्शाने जाणुन घेते
पण स्वत: न गाते गाणे त्या प्रेम म्हणू मी कैसे
चौकटी कधी ना सोडी श्वासाला कुंपण घाली
ना बनते कधी दिवाणे त्या प्रेम म्हणू मी कैसे
ना पंख असोनी उडते पंख्यासम लटकत फिरते
ना ठाऊक त्यास वहाणे त्या प्रेम म्हणू मी कैसे
विरहात कधी ना झुरते मीलनी कधी ना बुडते
जे रचते फक्त उखाणे त्या प्रेम म्हणू मी कैसे