In the first sher of this Ghazal, the poetess says, she hears God’s voice everywhere. She says sound of God’s footsteps makes her go crazy with joy. She wonders, small things about God can give so much joy then how he would be in reality.
जिथे तिथे मी तुला ऐकते, कधी गीत मम बनशिल रे?
चाहुल इतुकी वेड लावते खरा कसा तू असशिल रे?
मार्ग जरी हा सरळ वरवरी, ऐक मना तू वळशिल रे;
वळणा-वळणा वर फुलबागा अत्तर होऊन झरशिल रे!
आहे मार्दव, आहे आर्जव, भीति कशाची मग तुजला;
खुशाल टिपुदे कुणी मनोगत टिपणाऱ्यांना टिपशिल रे!
आजवरी जे आवडले तुज, खरेच निसटुन गेले का?
आता कळते आणी वळते, म्हणुन इथे तू रमशिल रे!
प्रतिमेला अभिषेक जसा हा, प्रक्षालन ही हवे मना;
साद ऐक ही मधुर आतली, दवबिंदूसम खिरशिल रे!
अष्टद्रव्य तू लाख अर्पिले, वाहशिल जर भावफुले;
सुनेत्रातल्या अश्रूंमध्ये, चिंबचिंब बघ भिजशिल रे!