This Ghazal is written in Akasharganvrutta. Vrutta is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. In this ghazal Radif is Re. Re is the word used for calling our close friend. In this Ghazal two kafiyas are used. So it is Jul-Kafiya Ghazal. Two kafiyas are vaat-kaat, lavate-marate and so on.
साऱ्या जुन्या कथांची मी वाट लावते रे
निवडून चाळते अन काट मारते रे
दावू नकोस मजला आकाश फाटलेले
शिखरास गाठण्या मी हा घाट चालते रे
संसार लेखणीशी आहे मला सुखाचा
घेऊन पाटपाणी मी ताट मांडते रे
जाऊ नकोस सखया सोडून मज कुठेही
रानात केतकीच्या मी वाट पाहते रे
गाण्यात शब्द माझ्या बहरून आज येता
सौंदर्य या धुक्याला घनदाट लाभते रे
बांधेन बंगला मी बागेत तव फुलांच्या
नेत्रात स्वप्न माझ्या तो थाट पाहते रे
वाळूवरी सुनेत्रा मी नाव रेखिताना
आकाश रंगलेले अन लाट नाचते रे
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.