This Ghazal is written in 16 matras. Different flowers are described in this Ghazal. Here Radif is Aahe. Kafiyas are khirate, fulate, daravalate, lakhalakhate etc.
हळूहळू मी खिरते आहे
तरी कशाने फुलते आहे
दूरदूर त्या बनी केतकी
माझ्यासम दरवळते आहे
नाही वादळ नाही वर्षा
वीज तरी लखलखते आहे
नकोस उधळू गंध असा तू
मोगऱ्यास मी वदते आहे
लेकुरवाळी कण्हेर भोळी
भूचंपेवर जळते आहे
तहानलेल्या जळात वेडी
मासोळी का फिरते आहे
त्या बकुळीला कळेल केव्हा
कोणासाठी झुरते आहे
निशीगंधेसम होशिल का तू
तुटते पण ना झुकते आहे
सांग सुनेत्रा मस्त दुपारी
सांज कशी ही हसते आहे