This Ghazal(32 matras) deals with a social issue. Radif of this is Muktee. Muktee means freedom. But the word freedom should be viewed through various angles.
स्वातंत्र्याचे गात तराणे(पवाडे) डोक्यावरती बसली मुक्ती
कशास करशी कंठशोष तू हृदयामधुनी वदली मुक्ती
राखिव जागा आल्या आणि राज्यावरती बसली राणी
रिमोट पण राजाच्या हाती कसला मोक्ष न कसली मुक्ती
सासू खुडते श्वास सुनेचे गर्भामधल्या मुग्ध कळीचे
नागोबा हा अजून डुलतो नागिण होऊन डसली मुक्ती
अजुन द्रौपदी आणि अहिल्या घराघरातुन न्याय मागती
डोळ्यावरती बांधुन पट्टी दरबारी अवतरली मुक्ती
कशास नक्कल भ्रष्ट हवी तुज राख वेगळे तुझे तुझेपण
पात जणू तू तलवारीची ठोकर आता नकली मुक्ती
पंख सुनेत्रा तुला मिळाले रिंगण तर तू कधिच लंघले
निळ्या अंबरी घेच भरारी नको म्हणू तू फसली मुक्ती