पृथ्वी आहे गोल सख्या रे – PRUTHVI AAHE GOL SAKHYA RE(FRIEND..EARTH IS ROUND)


किती दिवस मी रदीफ व्हावे बोल सख्या रे
मीच काफिया ओळख माझे मोल सख्या रे

कशी अवेळी साद घालते कविता वेडी
सावर मजला जातो माझा तोल सख्या रे

ते तेव्हाचे गीत गुलाबी अता हवे मज
हवेहवेसे बुडवी मज ते खोल सख्या रे

दिवस संभ्रमित हे पण सरतिल मेघ वर्षतिल
स्मरण ठेव तू पृथ्वी आहे गोल सख्या रे

जागेपणी  तव लाख बहाणे फुत्कारांचे
स्वप्नामध्ये गझलेवरती डोल सख्या रे

येऊदे मज अता ‘सुनेत्रा’ भेटच मजला
तास संपला खरा वाजला टोल सख्या रे

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.