In this Ghazal, memories of childhood days and teenage days are shared with us.
This Ghazal is written in 20(twenty) matras.
ती कशास हे काळिज चाळत बसते
अन स्वप्नांचे दुकान मांडत बसते
ती स्वप्ने ओली चुलीत ना जळती
मग त्यांना ती उन्हात सुकवत बसते
जाऊन पुन्हा मी लिंबोणी मागे
तो चांदोबा नभात शोधत बसते
हे शब्द नाचरे फिरती अवती भवती
मी शिताफिने गळात ओढत बसते
ती मूढ ‘सुनेत्रा’ मौन घेतसे म्हणुनी
मी ओठांना तोरण लावत बसते