वनदेवीच्या वनात जागा आपण पाहू
वनदेवीच्या रणात बागा आपण पाहू
भरले जे जे कषाय तू जे अंतर्यामी
वनदेवीच्या तनात रागा आपण पाहू
फुलाफुलांवर कळ्याकळ्यांवर रंग दुपारी
पावसात पण सौरभ प्राशत दंग दुपारी
रंगबिरंगी छत्रीमध्ये पाऊस धार
अधिक श्रावणी चिंब चिंब मम अंग दुपारी
मनपसंत या हवेत फिरुया गाऊ गाणे
पाकोळ्यांसम मजेत उडुया गाऊ गाणे
गझल रुबाई मुक्तक अष्टक मस्त लावणी
सूर ताल लय ठेका धरुया गाऊ गाणे