Category: Ghazal

  • पुस्तके – PUSTAKE

    मूर्तीस त्या पाहून ये नागासवे डोलून ये ज्या घातल्या शपथा तुला त्या सर्व तू माळून ये जी पुस्तके मी वाटली ती पूर्ण तू वाचून ये अभिषेक तू केला जरी ती नग्नता जाणून ये जे बांधती तुज सारखे ते हात तू बांधून ये जे पत्र तू नाही दिले पत्रास त्या घेऊन ये जे रंग माझे लपविले…

  • तथास्तु – TATHAASTU

    उधाणल्या सागरात तारू अजून माझे टिकून आहे सुन्या तुझ्या भैरवीत कोणी उदासवाणी बसून आहे दहा दिशा मोकळ्या मला या खुणावतो आसमंत सारा नभात अभ्रे फुलून येता तयामधे मी भरून आहे तहान तृष्णा तुला तिलाही कुण्या सुरांची तिलाच ठावे मुक्या मुक्या लावणीतला हा तरूण ठेका रुसून आहे तुझे नि माझे अगम्य नाते कुणास बेडी कुणास कारा…

  • चेरी – CHERRY

    चुटूक लाली तव अधरांची टिपून घेते रसाळ चेरी सुरभित रसमय गऱ्यास खाण्या तुला खुणविते खट्याळ चेरी अनंत बागा धरेवरी या फुला-फळांच्या फुलून भरल्या भरून येण्या तव रसवंती मधाप्रमाणे मधाळ चेरी तुझ्या मनातिल तरंग कोमल वहात जाण्या नदीकिनारी रदीफ मोहक मम गझलेचा जणू कमलिनी दवाळ चेरी टपोर माणिक जणु पदरावर तशीच बसते सजून पानी कितीक खोड्या…

  • महापुरुष – MAHAAPURUSH

    कराल दाढेतुनी सुटाया मलाच मृत्यू विनवित आहे खरेच का मी समंध भूत्या उगा कुणाला झुलवित आहे मला न कळते यमास सुद्धा खरेच कारे असे मरणभय म्हणून तोही धनुष्य ताणुन शरांस माझ्या अडवित आहे जुनाट कर्जे करून चुकती पुरापुरा मी हिशेब दिधला अता उधारी तुझ्याचसाठी मला परी ती सुखवित आहे हसून दुःखे किती उडविली हृदय सुखाने…

  • मरगठ्ठे – MARGATHTHE

    खुल्या मनाने रहा सुखाने मिळेल ते ते! तुझेच आहे!! जपेल जो रे घरकुल मंदिर गृहस्थ तो रे! खरेच आहे!! हिरण्यकेशी जलौघवेगा! अशीच नावे तशीच ती का? असा न कोणी सवाल पुसतो कुणी कुणाला बरेच आहे!! हितास जप तू स्वतःच अपुल्या कुणी न दुसरा जपेल त्याला; असेल ज्याचा प्रपंच सुंदर! तयास मुक्ती इथेच आहे!! अधर्म कुठला?…

  • वत्सल देवी – VATSAL DEVEE

    अता प्रभाती फुलापरी मी पहाट स्वप्नामधे दिसावे असेच सुंदर स्वरूप माझे सतेज हृदयी तुझ्या फुलावे वनहरिणी मी किरण शलाका उधाणलेली कधी जलौघा निळे सरोवर प्रशांत सागर विलीन होण्या मला खुणावे धरेवरी या पिकोत मोती उदंड मुबलक फुले फुलावी सुजाण शासक असा असावा असी मसी अन कृषी फळावे अचौर्य पालन व्रतास धरण्या कुणी न चोऱ्या इथे…

  • स्वभाव – SWABHAAV

    स्वभाव माझा तुला कळावा विभाव विपरित मला कळावा कुरूप म्हणजे धरा स्वरूपी खराच सम्यक तिला कळावा कमाल विकृति जळून जाण्या निसर्ग प्रकृतितला कळावा तनास जपण्या मना फुलविण्या धरेतला धर फुला कळावा जरी न अक्षर टपोर मोती तयातला गुण जला कळावा फिरून त्याला बघेन यास्तव बराच की तो भला कळावा जरी कमी तो असेल बोलत विखार…