चालतेस चंचले – CHAALATES CHANCHALE


चालतेस चंचले उन्हात गीत गात गात
पावसात वादळात उग्र शीत गात गात

सोड हात हो पुढे भरार उंच क्षितिज पार
झेप यान घेतसे तुझीच जीत गात गात

नाव चंचला जरी सदैव शांत चित्त शुद्ध
वाट चालते सदैव जोजवीत गात गात

वाटतात ही फुले सुगंध रंग या जगात
सांडतात बरसतात देत प्रीत गात गात

हृदय कमल तृप्त नीर त्यात वाहतो तरंग
सूर ताल लय धरून बासरीत गात गात

वृत्त – चंचला, मात्र २४
लगावली – गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/

 

 


2 responses to “चालतेस चंचले – CHAALATES CHANCHALE”

  1. अतिशय सुक्ष्म निरीक्षण, प्रगल्भ विचार आणि ओघवती भाषाशैली याचा सुरेख संगम म्हणजे सुनेत्रा ताईचे लिखाण.

    समाजातील चालीरीतींचा सुक्ष्म अभ्यासही लेखनात उमटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.