Category: Ghazal

  • खरे काय आहे – KHARE KAAY AAHE

    खरे काय आहे बरे काय आहे कळावे तुलारे तुझे काय आहे तुला पाहिले मी तुला ऐकले मी तरी जाणलेना भले काय आहे गुपीते मनाची जुनी रेखताना जरा अनुभवावे नवे काय आहे इथे पूर्ण नाही कुणाचेच काही तरी आस शोधे पुरे काय आहे  किती मोह तुजला उणे शोधण्याचा अता अधिक शोधू खुले काय आहे नसे तू…

  • खरे स्वप्न हे – KHARE SWAPN HE

    तुला भाजते जर मृदुल चांदणे कसे भर दुपारी असे चालणे जरी टाकवेना पुढे पावले तरी तू मनाने शिखर गाठणे इथे कार्य अर्धे करू पूर्ण ते जिवा ध्यास घेऊ पुरे छाटणे उगा कोश विणणे फुका उसवणे गगन झेप घेण्या तया फाडणे पुन्हा धीर देण्या बरे बोलुया पतंगास वेड्या नको जाळणे भुकेल्या जनांना भरव घास रे बनव…

  • सुपली – SUPALEE

    सुकली खपली उडली खपली गहू चवीचा असली खपली रडकी कन्या हसली खपली भरण्या कचरा सुपली खपली जखमा भरता धरली खपली नकळत माझ्या पडली खपली स्वर्ग गाठण्या गळली खपली मात्रावृत्त – (४+४=८मात्रा)

  • फुलझडी – FULZADEE

    गझल माझी मधुर बाला वाचते बाराखडी वाचताना बरसते बघ चांदण्यांची फुलझडी चंद्र सुंदर अंबरीचा रंगलेला या क्षणी मुग्ध त्याचे रूप कोमल टिपुन घेते ही घडी तारकांचा खेळ चाले पकडण्या उल्केस या सापडेना ती तयांना खेळती मग त्या रडी ही न उल्का ही कळीरे आत्मगंधी दंगली फेकण्या जाळे तिच्यावर राज्य घेई नवगडी राज्य घेतो ध्रुव जेव्हां…

  • भेट – BHET

    पेरता मी बियाणे खरे नंबरी वृक्ष चुम्बेल आता घना अंबरी काय देऊ तुला भेट मी सुंदरी नाद हृदयातला वाजता घुंगरी शोधण्या फूल दुर्मीळ जे माणसा रानवाटा फिरे मी तळी अंतरी दावले रूप देवा तुझे मी जगा प्राण ओतून मूर्तीतल्या कंकरी मी लढे माझिया सावळ्या  मिळविण्या होउदे जीत वा अंत या संगरी वृत्त – गा ल…

  • किरण मंजिरी – KIRAN MANJIREE

    जाळीतुन पानांच्या उमले किरण मंजिरी सळसळणारी रविकर कुलकर करिता करणी झुळुक गुंजते झुळझुळणारी सुनेत्र उघडी भास्कर दोन्ही मिटते डोळे लज्जित अवनी नयनांमधुनी सुरेख वर्षे मुक्त निर्झरा खळखळणारी  

  • मजा – MAJAA

    जाण आता खरी ताणण्याची मजा ताणता ताणता जाणण्याची मजा ज्यास कळते पुरी लांबण्याची मजा त्यास भावे न ती खेचण्याची मजा ढील आता कशाला हवी रे तुला घे नभी वावडी काटण्याची मजा थंड ओठांवरी ठेवुनी ओठ तू लूट बर्फामधे गोठण्याची मजा सांग कारे  तुला ना कळाली कधी जिंकुनीही रणी हारण्याची मजा वृत्त – गा ल गा, …