-
कॅनॉल – CANOL
निर्झर झाला म्यूट कॅनॉल कॅनल अथवा रूट कॅनॉल खेचुन पाणी शेतीसाठी भरून काढे तूट कॅनॉल योनि गती की रोग असावा यक्ष प्रश्न हा कूट कॅनॉल दो जमिनींच्या मैत्रीमध्ये नकोच पाडू फूट कॅनॉल रत्नपारखी गुणानुरागी मुनी दिगंबर क्यूट कॅनॉल पूल बांधण्या कॅनल वरती देय सुनेत्रा सूट कॅनॉल
-
स्तूप – STOOP
टिकटिकणारे घड्याळ काटे चिदानंद चिद्रूप शांत जिनालय मूर्त अंतरी मंदिर स्थानक स्तूप शिवार वावर रान शेत अन जमीन गझलांकीत पाखडती घन शब्द अक्षरे हस्तामधले सूप रुजण्यासाठी उपादान अन निमित्त जुळता योग तडाग तीरी धोंडयावरती आत्मा बीजस्वरूप कैद भावना भ्रमर मनातिल मिटूनी नयन दले कैक काफिये गोळा झाले फार रगड वा खूप साय दही घुसळून सुनेत्रा…
-
नमाज – NAMAAJ
न माज माझा नमाज सा रे णमो तथास्तु णमोच गा रे च नच भरीचा जाणशील तू असो रुबाई मुक्तक तारे शील शोधण्या नको भ्रमंती शोध स्वतःतच पिऊन वारे शेर मस्त हा चतुर्थ स्थानी छानच शोभे म्हणती सारे गझल पूर्ण मम सार्थ सुनेत्रा उन्हात तपता जळले भारे
-
पहार – PAHAAR
धुके कपोती हवा गुलाबी निहार आहे शिशिर ऋतू पण बनी शराबी बहार आहे दवाळ बागा उले फुले केवडा सुगंधी परिमल कैदी कळी शबाबी तिहार आहे किती जरी घन तुझी लबाडी कुटील कपटी तुज उडवाया हजरजबाबी प्रहार प्रहार आहे तडाग भूवर गडद निळे जल दलात मिटल्या.. सजीव स्वप्ने दिवाण काबी न हार आहे नवीन क्षुल्लक जिनागमातिल…
-
कुरल सृष्टी – KURAL SRUSHTEE
रंगली मेंदीत भिजुनी गार हिरवी गझल सृष्टी बिल्वरी सोन्यात झळके ताम्र तांबुस धवल सृष्टी लेखणीने मी खणे ती अक्षरांची खाण आहे हरघडी लयलूट करण्या वर्णमाला नवल सृष्टी वाट वळणाची जरी ही पावलांना साथ देते जिनस्तुतीमय काव्य तिरुवल्लूवरांची कुरल सृष्टी गच्च आभाळी कडाडत वीज भेदे जलद भारी कोसळे पाऊस धो धो प्राशुनी जल सजल सृष्टी नीर…
-
सबूत – SABOOT
कता .. पथ्य पाळता कळते तथ्य जिवा तथ्य जाणता गळते मिथ्य जिवा सत्य प्रकटता असत्य गायब रे धर्म अहिंसा पालन पथ्य जिवा गझल… पित्तासाठी मात्रा आहे सूतशेखर स्मशानातले पळवून लावे भूत शेखर जिनालयाच्या गाभाऱ्यातिल मूर्त शेखर नाभीराज अन मरुदेवीचा पूत शेखर मोक्षा गेला कैलासावर मुनि दिगंबर निर्वाणाचा जणू भासतो दूत शेखर कधी न अडके कुंडलीत…
-
संगनमत – SANGANMAT
जाण डाव आडनाव गाव कोणते खरे गूढ त्या शिवालयात बाव कोणते खरे संगनमत संगणक न प्रीत शब्द जोडते बेल पर्ण रंग भोर ताव कोणते खरे दगड गुंड पावसात झिंग चिंब शेंदरी वाळती उन्हात पिंड भाव कोणते खरे रे स अर्थ काय रे रुमाल बीज मंत्र हा पुरुष स्त्री कुणी असोत राव कोणते खरे प्रश्न उत्तरातले…