Category: Ghazal

  • भद्र – BHADRA

    राम हृदयी राम कमली राम माझ्या श्याम नयनी राम रंगी राम वचनी राम ध्यानी राम भजनी गा सुनेत्रा राम प्रहरी आठवा बल भद्र जइनी राम बाणी कृष्ण धरणी घाम गाळे राम चरणी चाक फिरवे राम सजणी मम धनुर्धर राम करणी राम काष्ठी राम दगडी काय वर्णू राम कवनी जन्मभूमी जनक जननी गात फिरते गझल रमणी…

  • मांजर – MAANJAR

    मांजर बघते मिटून डोळे मांजर असते हुशार खूप मस्त कलंदर मांजर भोळे मांजर असते हुशार खूप हवे तेच जे स्वतःस करते मांजर नसते कधी गुलाम मोक्षाच्या वाटेवर लोळे मांजर असते हुशार खूप कधी शिकारी तर हलवाई उन्हात बसते अटवित क्षीर थंड खव्याचे करते गोळे मांजर असते हुशार खूप उंचावरती बसून घाले गस्त नेहमी वळवित मान…

  • सद्दी – SADDEE

    ही जरी फोफावली कांही दुकाने जिद्दी पुरी तीच ती काढेन रद्दी उलथवूनी सद्दी पुरी या चला मांडून उकलू प्रश्न जे जे भंडावती सत्य धर्मी मी सुनेत्रा मिथ्य झटके रद्दी पुरी

  • चिटणिस – CHITNIS

    लुगडे सारी पातळ शालू अंबर डेपो रे पदर हवायिन काठ भरजरी झुंबर डेपो रे तवंग कचरा पाण्यावरती डासांची अंडी बंद कालवे उघड दावण्या डिम्बर डेपो रे कृष्ण कडप्पा तांबड गडवा जांभरत्न किरीट गुलाब झेंडू रजनीगंधा टिम्बर डेपो रे नांदरुकी वट पाकर पिंपळ वृक्षांवर पक्षी उदूंबराच्या वृक्षतळी फळ उंबर डेपो रे कृष्णे तीरी ग्राम बावची कात्यायनि…

  • कॅनॉल – CANOL

    निर्झर झाला म्यूट कॅनॉल कॅनल अथवा रूट कॅनॉल खेचुन पाणी शेतीसाठी भरून काढे तूट कॅनॉल योनि गती की रोग असावा यक्ष प्रश्न हा कूट कॅनॉल दो जमिनींच्या मैत्रीमध्ये नकोच पाडू फूट कॅनॉल रत्नपारखी गुणानुरागी मुनी दिगंबर क्यूट कॅनॉल पूल बांधण्या कॅनल वरती देय सुनेत्रा सूट कॅनॉल

  • स्तूप – STOOP

    टिकटिकणारे घड्याळ काटे चिदानंद चिद्रूप शांत जिनालय मूर्त अंतरी मंदिर स्थानक स्तूप शिवार वावर रान शेत अन जमीन गझलांकीत पाखडती घन शब्द अक्षरे हस्तामधले सूप रुजण्यासाठी उपादान अन निमित्त जुळता योग तडाग तीरी धोंडयावरती आत्मा बीजस्वरूप कैद भावना भ्रमर मनातिल मिटूनी नयन दले कैक काफिये गोळा झाले फार रगड वा खूप साय दही घुसळून सुनेत्रा…

  • नमाज – NAMAAJ

    न माज माझा नमाज सा रे णमो तथास्तु णमोच गा रे च नच भरीचा जाणशील तू असो रुबाई मुक्तक तारे शील शोधण्या नको भ्रमंती शोध स्वतःतच पिऊन वारे शेर मस्त हा चतुर्थ स्थानी छानच शोभे म्हणती सारे गझल पूर्ण मम सार्थ सुनेत्रा उन्हात तपता जळले भारे