सुपली – SUPALEE ( sweepings pan)


सुकली खपली
उडली खपली

गहू चवीचा
असली खपली

रडकी कन्या
हसली खपली

भरण्या कचरा
सुपली खपली

जखमा भरता
धरली खपली

नकळत माझ्या
पडली खपली

स्वर्ग गाठण्या
गळली खपली

मात्रावृत्त – (४+४=८मात्रा)


One response to “सुपली – SUPALEE ( sweepings pan)”

  1. *
    अहाहा !
    भरण्या कचरा
    सुपली खपली —

    नितांत नवीन प्रतिमा —
    अनुप्रास —
    आशय गर्भितता —
    अद्वितीय त्यागाचे चित्रीकरण —
    वरून ” खपली ” चा श्लेष —
    सर्व काही लय वृत्त काटेकोर सांभाळून —
    प्रणाम ! प्रणाम !! प्रणाम !!! सुनेत्रा ताई —-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.