Category: Ghazal

  • केवळ आत्मा शरण्य आहे – KEVAL AATMAA SHARANYA AAHE

    God lives in our own Heart. मात-पित्यांना नमन करावे गुरु म्हणोनी चरण पुजावे प्रेमच देते श्वास जगाया त्या प्रेमाने धरण भरावे प्रेमामध्ये  कशास संशय आशंकेचे हरण करावे देव न लपतो हृदयी वसतो सदा मानसी स्मरण असावे कमलावरल्या दवबिंदूसम वाणी म्हणजे सुमन असावे केवळ आत्मा शरण्य आहे दुजापुढे का शरण असावे

  • वसे कसे लपवू – VASE KASE LAPAVU

    Vasaa means Rule taken by our own desire to become happy and satisfied. ओठांवरले तव ओठांचे ठसे कसे लपवू डोळ्यांमधुनी दिले घेतले पिसे कसे लपवू हृदयी उसळे नाव तुझे अन कंप सुटे श्वासा काळजातल्या हरिणी आणिक ससे कसे लपवू जरी कुशल मी बुडविण्यात बघ लोचनात प्रीती देहावरच्या रोमांचांना कसे कसे लपवू करवंदी डोळ्यांच्या खिडक्या जांभुळ…

  • साद मी -SAAD MEE

    साद मी राध मी नाचरा नाद मी गझलेस दाद मी जिंक तू बाद मी संवाद वाद मी

  • रोखलेस जरि श्वासाला – ROKHALES JARI SHVASALA

    पूर्व प्रसिद्धी-साहित्य-लोभस दिवाळी २००७ रोखलेस जरि श्वासाला कसे डांबशिल हृदयाला बोलायाचे खूप जरी कसे समजवू मौनाला नको थोपवू प्रवाह तू सोड आगळ्या हट्टाला फक्त हवा जर उदो उदो पगार दे मग भाटाला धर्म सांगतो सर्वांना पंथ न कुठला प्रेमाला कक्षेमध्ये  नको फिरू झुगारून दे मार्गाला

  • सलतो उरात काटा – SALATO URAT KATA

    सलतो उरात काटा हसतो गुलाब हारे करतात ढोंग अश्रू फसशील लोचनारे रुतती फुलेच आम्हा वदतात कोण जोगी तुडवून पुष्प पायी हसतात भोगणारे लपवून आत वाफा बिजली कडाडतेही झरशील मूक मेघा बुडतील काठ कारे उडतो नभात आहे आता पतंग माझा येणार मीच खाली थकतील हात सारे मम भाव पुष्प होडी फिरते जली मनाच्या पकडून ठेवी ओठ…

  • माधुर्य त्या स्वराचे – MADHURAY TYA SWARANCHE

    Rubaai. एका वनात गातो रावा किती सुरेल आहे टुकार गाणे म्हणतात ते चढेल त्यांना कसे कळावे माधुर्य त्या स्वराचे गीतात दाटलेल्या गंधीत भावनांचे

  • घन करवंदी – GHAN KARAVANDI

    घन करवंदी डोळा सखया झरणारा हिंदोळा सखया मुठीत नाही रहावयाची मी बर्फाचा गोळा सखया खेळशीलका जपून धुळवड सण बैलांचा पोळा सखया गोड रसाचे गुऱ्हाळ वाजे इक्षू चोळामोळा सखया भांग समजुनी पितोस लिमका किती किती तू भोळा सखया म्हणू नको ना तिला बहकली वय गझलेचे सोळा सखया