Category: Ghazal

  • पुरावे – PURAVE (PROOFS)

    पावलांनी इथे का वळावे ? डोळियांनी असे का झुकावे? भेट झाली खरीना तरीही, गीत ओठी कशाने फुलावे! मी न माझी कुणीरे! कुणाची ? प्रश्न वेडे मला का पडावे ? टाळले आसवांना तरीही आज गाली हळू तू फुलावे! अर्थ सांगू कसे मी कुणाला? श्वास माझे तयांचे पुरावे वृत्त- गा ल गा गा, ल गा गा, ला…

  • कवच-कुंडले – KAVACH-KUNDALE (ARMOR AND EARRINGS)

    In this Ghazal the poetess describes ten best virtues in human beings. क्षमा धर्म हा पाया उत्तम या झाडाची छाया उत्तम मार्दव माझे मम गझलेसम चिंब चिंब भिजवाया उत्तम आर्जव म्हणजे सरल-तरल मन मस्त मोगरे जाया उत्तम सत्य शिवाहुन सुंदर असते पुरते कळले राया उत्तम संयम म्हणजे जणू कस्तुरी अत्तरातला फाया उत्तम शौच म्हणा वा,…

  • पहिली गाडी – PAHILI GAADI(EARLY MORNING TRAIN)

    In this Ghazal the poetess says, only our soul is pure. मिरवाया भाळावर टिकली गीते माझी तुजला दिधली वाट पाहुनी तुझी सख्यारे डोळ्यांमधली स्वप्ने निजली उभ्यानेच मी प्रवास केला माझी पहिली गाडी चुकली डोहाळे ना मज गोडाचे हवी हवीशी खमंग चकली केवळ आत्मा शुद्ध सुनेत्रा शुभ-अशुभाचे ही फळ नकली

  • दर्शन – DARSHAN (VIEW)

    In this four lined poem it is described that how sweet and colourful fruits are! दर्शन या मधुर पक्व फळांचे नयनी रेंगाळी अमृतासम चव केळीची जिभेवरी घोटाळी गंध जुईचा वेड लावतो झुळूक लपेटी तन हृदयी चाहुल वाजे पाऊल ऐकत भूपाळी

  • होळी अशी जगाची – HOLI ASHI JAGACHI (HOLI FESTIVAL)

    In this Ghazal the poetess says, Now I am free. I don’t want to find out the answer within the question. I want to live life truly. कसलाच छंद आता मज बांधणार नाही हृदयी असेल घुंगरू मी नाचणार नाही मी फोडले असेका ते वाजले असे का प्रश्नात उत्तरांना मी शोधणार नाही डोळ्यात सांडलेले तू चांदणे…

  • खजिना – KHAJINA (TREASURE)

    Akasharganvrutta used in this Ghazal is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA LA. In this ghazal the poetess says, I have tried my best to get answers of  painful questions. अंगार पेटलेला मी पाहिला तुझ्यात तापून लाल वारा झाला निळा तुझ्यात निशब्द हुंदक्यांनी काळीज गोठताच सारी अबोल गाणी…

  • गझलेत बोलते मी – GAZALET BOLATE MEE (I AM SPEAKING IN LANGUAGE OF GAZAL

    गझलेत बोलते मी गझलेत रांगते मी वाऱ्यास झिंगलेल्या गझलेत डांबते मी वेडी म्हणोत कोणी अथवा अतिशहाणी बेधुंद मम कहाणी गझलेत कांडते मी बाईस दु:ख जाळी बाई तिलाच टाळी बाईपणा निराळा गझलेत मांडते मी धर्मास गाडुनी का नावास पूजती हे पूजा करा गुणांची गझलेत सांगते मी या वाहिन्या नि पत्रे हितगुज नित्य करिती सज्ञान माध्यमांशी गझलेत…