Category: Ghazal

  • पद्माग्नी – PADMAGNEE( FIRE LOTUS)

    जलद गतीने जलद बरसले जलधर गगनी गाली हसले कडाडताना वीज नभांगणि ढग घन लोभी का खेकसले मुसळ घुसळती पाऊस धार जणु कोसळते कंटक धसले जिनालयाच्या कलशामध्ये पद्माग्नीचे धन रसरसले भलेभले जनवारी धारक असे कसे दलदलीत फसले कुंडीमधल्या मनीप्लांटला कोरफडीचे घनमूळ सले ओळख पाहू तूच सुनेत्रा कोण तरकले कोण तरसले

  • निळा गारवा – NILA GARAVA(BLUE COOLNESS)

    मळलेल्या मम वाटेवरती मळता का हो जुन्या पुराण्या जखमांतुन भळभळता का हो शब्दांना तू पुद्गल म्हणुनी वापर मर्दा पूस जनांसी शब्द ऐकुनी चळता का हो बनी केतकी दाटुन येता गंध मृदेचा नागवेलिच्या पानांवर सळसळता का हो खोल डोह मन अथांग पाणी गडद काळिमा झऱ्याप्रमाणे नीरावर खळखळता का हो चमकायाचे नव्हते जर तर उगा फुका रे…

  • जिवंत – JIVANT(ALIVE)

    प्रेम खेचण्या इतुकी ताकद सुरात माझ्या माझी नियती दवा जादुई करात माझ्या हवेत परिमल तरंगणारा लयीसवे मम बागडती पाखरे अंगणी घरात माझ्या असेल वेडा पीर कुणी तो नेक जाणता मोहरून थरथरतो भिजतो स्वरात माझ्या हरेक जीवांसाठी माझा जीव जागतो जिवंत स्वप्ने दिडदा दिडदा उरात माझ्या ताल गझलचा ठेका अनवट प्राण सुनेत्रा कळ मायेची बळ गरुडाचे…

  • खलास – KHALAAS (OVER)

    खलास … मुक्तक खलास करते रण अतिरेकी डोके एखादे खलात कुटते चिकण सुपारी डोके एखादे गडे काफिया मुक्तकातला ओळख सुंदर रफार ई वर जणु वेलांटी डोके एखादे अलबेली … मुक्तक जशी टोकरी हवी हवेली हवी तशीच मैत्री मज अलबेली हवी कुसुमांकित तनु पर्ण चित्र पाऊस अशीच छत्री कवीस वेली हवी

  • नंदनु – NANDNU (SON)

    अती लघुत्तम कथा नंगुडी दात्री पटवारी अतीव लटपट कलिके नंतर दाटी पळणारी असीम लवचिक कळा नंबरी दाई परदेशी अलगुज लटके कळ नंदीश्वर दामे पटणारी अविनाशी लय करात नंदनु दाजी परमोही अरुलता करी नंदादीपक दाखल परनारी अग्नी लवलव कशा नंदिनी दामाजी पवना अनवट लसती कट्यार नंगी दावत पथावरी अवचित लपुनी कचरा नंदा दाबे पटपट असली ललना…

  • खरेदी – KHAREDEE(PURCHASE)

    असा मी असामी न कासव ससा मी कराया खरेदी उघडला कसा मी जपायास जीवा हिताचा वसा मी उठवते वहीवर मनाचा ठसा मी मनाला सुनेत्रा धुते खसखसा मी

  • ई मेल – E MAIL

    जुना पुराणा नेल कटर धार पुन्हा परजेल कटर कराकरा कापुन टाळा शटर नवे उघडेल कटर गंज ब्लेडच्या पानांचा पुन्हा पुन्हा खरडेल कटर खोचुन बोथट सुरे बिरे सीट कव्हर फाडेल कटर तत्त्वार्थातिल सूत्र धरुन जीवाला जगवेल कटर भीतीची झटकुन झुरळे असत्त्यास मारेल कटर वेळ सुनेत्रा मम साधुन पाठवेल ई मेल कटर