Category: Ghazal

  • ग्रीन पीस – GREEN PEACE

    शांत कमल दली लेक निगीण लाल लाल जरी नेक निगीण मुक्त गझल तळी अंतर मीर धवल तरल सयी डेक निगीण जन्मदिवस लिली शांत तडाग कृष्ण नील जली केक निगीण गुरु दिगंबर घन श्यामल धीर पूर्व पुण्य जणू चेक निगीण लक्ष अब्ज जगी  कलश मिनार ग्रीन पीस मणी एक निगीण क्षीर नीर रवी शीतल मून शेक…

  • नेक – NEK (NOBLE)

    नेक … शांत कमलदली लेक निगीण लाल लाल जरी नेक निगीण मुक्त गझल तळी अंतर नीर धवल तरल सयी डेक निगीण गुरू पौर्णिमा … सहज सलिल लीलया दावते बिम्ब अंतरीचे स्वरुप जळस्थळी खरे दावते चिम्ब अंतरीचे कलेकलेने निज आत्म्याची कळी उमलता सिद्ध शिलेवर प्रतिक दावते टिम्ब अंतरीचे

  • मेरुस्तंभ – MERU STAMBHA(SPINE CORD)

    मेरुस्तंभ मम जिनालयाचा भक्कम पाठीशी कार्य कराया आत्महितास्तव कायम पाठीशी सिद्धासन धनुरासन माझे जिनमूर्ती पुढती नित्य पहाटे आसनमुद्रा उद्यम पाठीशी शब्द अक्षरे नित्य परजुनी धार तयां लावते स्वमन जिंकण्या दशधर्मातिल संयम पाठीशी जीव जगाया जीवनदायी रस पाजे भूमी सृष्टी जपण्या पंचभुतांचा आलम पाठीशी घाम रक्त सांडून निर्जरा सुनेत्रास करण्या पुण्याईच्या संचितातली रक्कम पाठीशी    

  • चौखूर – CHOUKHUR(GALLOPING AT FULL SPEEDWITH ALL FOUR HOOVES)

    उधळले घोडे रणी चौखूर आता संयमाचा बदलला बघ नूर आता आज मी पण या घडीला संकटांना ठोकल्यावर जाहली ती चूर आता मासळी बाजार नाही भरत देही काजळेना लोचनांना धूर आता लाभल्यावर दूरदृष्टी आत्मश्रद्धा संपला तो काळही निष्ठूर आता सांजवाती तेवताती मम सुनेत्री अंतरी ना माजते काहूर आता

  • घुमट – GHUMAT (A DOME)

    हृदय गर्भात रत्नत्रय झळझळाया भरुन धर कलशास करकमली वसे शासन जिनांचे पूर्ण ब्रह्मांडी खिरे वाणी त्रिदल कमली नको रोखूस श्वासाला नको चुकवूस नजरेला भिडव नेत्री भिजाया चिंब प्रतिबिंबी नयांच्या दोन धारांनी नयन कमली निळ्या नक्षत्र वाटांनी बरसता माळ वैशाखी झळा गात्री झरे संगीत लहरींचे रसा माळेत ज्वालांच्या सलिल कमली ऋतूंचे सोहळे साही टिपाया नयन आतुरले…

  • खेळ – KHEL(GAME)

    आत्मा माझा गुरू खरा निश्चय नय हा धरू खरा व्यवहाराची साथ मिळे खेळ जाहला सुरू खरा पुद्गल असती शब्द जरी मंत्र अक्षरी भरू खरा लंबक दोले हळूहळू भाव अंतरी झरू खरा मूर्त सुनेत्रा घडवाया चिरा चिऱ्याने चिरू खरा

  • देऊळ – DEOOL(TEMPLE)

    आत्म्यात काय नाही आत्म्यात सर्व काही सरसाव आज बाही आत्म्यात सर्व काही आहे अभंग अजुनी देऊळ देह मंदिर हृदयात ज्योत राही आत्म्यात सर्व काही तावून ठाकले हे चारित्र्य शुद्ध माझे देण्या स्वतःस ग्वाही आत्म्यात सर्व काही मम मातृभाव प्रीती जगण्यास श्वास पुरवी गर्भात धर्म दाही आत्म्यात सर्व काही ठिणगी उरी सुनेत्रा कर्मांस खाक करण्या अवगत…