-
ज्येष्ठ – JYESHTHA (SENIOR)
पुत्रा तुझ्या विना पण आहे कसा जिता मी भरल्या घरात सुद्धा असतो रिता रिता मी देहात घाम मुरवत मी वावरात राबे गगनात मेघमाला मन भाव तपविता मी उलटून साठ सत्तर गेलीत कैक वर्षे झालोय ज्येष्ठ आता आयुष्य अर्पिता मी हो जलद कृष्ण काळा ये बरसण्यास मजवर सुकल्या तृणाप्रमाणे आसावला पिता मी नव्हतो कधीच शायर त्यांच्यासमान…
-
ओणवी – ONAVI (STOOPING POSTURE)
भूवरी सांडते चांदणे चालताना गझलकारिणी माधवी जानकी जाण तू सत्य शिव पारखाया तुझी कागदी पल्लवी खोल गर्तेतल्या भोवऱ्यासंगती घेत वळसे झुले मोकळे मान वेळावते वल्लरी ही कवी कल्पना ना नदी जान्हवी दूर क्षितिजावरी दाटता मेघमाला निळ्या वीज लोळे पदी वेड लागे नभा चुंबण्याचे सुरे लाघवांनी तिच्या लाघवी पावसाची सुता ओतता घागरी मोतियांच्या सरीवर सरी सावळ्या…
-
मां – MAA (MOTHER)
जुन्या फायलींचे नवे बाड झाले तुझे मूळ कारण तुला कांड झाले तुला पावल्यावर बने बाहुली ती गगन चुंबण्याला जरी माड झाले तुझी लेक असुनी जणू लेक वाटे लढायास कुस्ती किती जाड झाले वसंतात भरले शिशीरात गळले उभी वाळल्यावर सुके हाड झाले धुके दाटल्यावर तुला ही दिसेना फुपाटा असोनी म्हणे राड झाले तुझे भुंकणे की नवी…
-
हिरवळ – HIRVAL (GREENERY)
देह मंदिरातिल आत्म्यावर हिरवळ मी तर सुकून जाण्या सर्वांगी फुलल्या काट्यांवर हिरवळ मी तर सुकून जाण्या दवात भिजल्या पहिल्या प्रहरी पहाटवाऱ्यासम तू येता टपटपणाऱ्या प्राजक्तावर हिरवळ मी तर सुकून जाण्या ग्रीष्माच्या काहिलीत वाळा घालुन भरता माठ जलाने वाळमिश्रित त्या उदकावर हिरवळ मी तर सुकून जाण्या सुगंध दशमीचे व्रत करुनी ऊद धूप जाळशील जेंव्हा धुपारतीतिल उदाधुपावर…
-
सूत्रबंधनी श्लोक- SUTRA BANDHANI SHLOK (A VERSE))
धो धो हसण्या खळखळुनी जन निरोग निर्मल जोक हवा सृष्टीचे गुणगान गावया स्वर सैराटी झोक हवा अज्ञातातिल स्वर्ग सुखे या मनास नच रे लोभवती इथल्या बांबू बनात फिरण्या हवा हवा इहलोक हवा शौक भू वरी मम जीवाला ऊर्ध्व गतीचा जरी जडे स्वतः स्वतः झरणारा निर्झर शोक मुक्त निर्धोक हवा स्वरानुभूतीतिल तत्त्वार्थी चिंब भिजवुनी गाणाऱ्या पाठीवर…
-
समर्थ -SAMARTH (CAPABLE)
मातृ पितृ धर्म ऐक्य सहज लक्ष्य आहे माझिया करात फिरवण्यास अक्ष आहे साक्ष द्यावयास आस श्वास हजर असता तोलण्यास शब्द अर्थ भाव दक्ष आहे बोलती जरी असत्य सत्य त्यास म्हणती वादळात कातळी तटस्थ वक्ष आहे कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष सौरवर्ष सांगे कोणता खरेच नित्य शुद्ध पक्ष आहे मी समर्थ रक्षिण्यास आत्मधर्म माझा प्रार्थनेत पण तुझ्याच…
-
अलकनंदा – ALAK NANDA (NAME OF RIVER)
आनंद कंद बाणा चित्रात मंजुषेच्या ज्योती समान गाथा चित्रात मंजुषेच्या आहे प्रवीण दुहिता..नृत्यात अलकनंदा गाते सुरेल माया चित्रात मंजुषेच्या उत्फुल्ल रंजनेने घनदाट कुंतलांवर बघ माळलीय फांती चित्रात मंजुषेच्या ओढाळ माधुरीला रेखा कशी कळावी आहे निमात नीती चित्रात मंजुषेच्या संध्येस स्वप्न भारी फिल्मी नवी सुजाता स्वातीस मोतिमाला चित्रात मंजुषेच्या कविता न चारुशीला आकाश नीलिम्याची मधुमास चांदण्यांचा…