-
हरवले नयन बघ श्यामले – HARAVALE NAYAN BAGH SHYAAMALE
हरवले नयन बघ श्यामले मौन हे अधर बघ श्यामले पर्ण हे लाल दो जुळवुनी लावले कुलुप बघ श्यामले पाकळ्या उमलण्या दोन या राहिशी अचल बघ श्यामले चेहरा लाभला तुज खरा देह तव सजल बघ श्यामले तुडविती माणसे ही भुई नेत्र तव सजल बघ श्यामले तू क्षमा धारिणी माय गे स्पर्शिते चरण बघ श्यामले तू धरा…
-
वीतराग ईश्वरा – VEETARAAG EESHVARAA
वीतराग ईश्वरा देच जाग ईश्वरा मंदिरात मूर्त ही ना सराग ईश्वरा पवन लहर शिंपिते मृदु पराग ईश्वरा फुलत राहुदे इथे प्रेम बाग ईश्वरा मज सुनेत्र लाभले दो चिराग ईश्वरा वॄत्त – सुकामिनी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगाल गालगा मात्राः २१२१ २१२ = ११
-
भाव खात राहिले – BHAAV KHAAT RAAHILE
भाव खात राहिले ते सुमार बोलले कर कबूल हा गुन्हा नागिणीस छेडले मी कधीच रे तुझे पाय नाय चाटले कपट माझियापुढे कोणते न चालले लहर मी असूनही वादळास चोपले शस्त्र अस्त्र टाकुनी ते भिकार पांगले वॄत्त – सुकामिनी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगाल गालगा मात्राः २१२१ २१२ = ११
-
गझल मीच मानिनी – GAZAL MEECH MAANINEE
गझल मीच मानिनी तेज वीज दामिनी कंठ हार तन्मणी मी सतार श्रावणी गा ल गा ल गा ल गा वृत्त हे सुकामिनी दीर्घ र्हस्व अक्षरे लग क्रमास जाणुनी हीच ती लगावली मी दिली लगावुनी गात गात मस्त मी लिहित जाय गुंगुनी घे गुलाबजाम हा साखरेत घोळुनी वॄत्त – सुकामिनी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगाल गालगा मात्राः २१२१…
-
लिहिते गझल जिथे मी – LIHITE GAZAL JITHE MEE
लिहिते गझल जिथे मी वाजे नुपूर तेथे कोणीतरी लपोनी येते जरूर तेथे तव नाव झाकता मी हसतोच शेर गाली मग ओळ ओळ माझी लाजून चूर तेथे पाऊस लेखणीच्या डोळ्यांमधून झरता भिजवून चिंब गात्रे नाचे मयूर तेथे शब्दांस वाकवे मी मज शब्द नाचवीती कोणीच ना उरे मग हांजी हुजूर तेथे तू लाख टाळशी पण मक्त्यात मीच…
-
भांडू नये कुणाशी – BHAANDOO NAYE KUNAASHEE
भांडू नये कुणाशी कळते तरी न वळते भांडायला न कोणी तेव्हा स्वतःस पिळते सारेच गोडबोले कंटाळले पुरी मी भांडायला अताशा कोणी कसे न मिळते? स्पर्धाच घेउयाका भांडायची कुणाशी टिकणार मीच खमकी ना मी मधून पळते भांडायचे कशाला कोणी म्हणू नये रे त्याची मजा लुटे जो त्यालाच फक्त कळते मनसोक्त दाद देते कद्रूपणा न करते जो…
-
माझ्यावरी फिदा ही – MAAZYAAVAREE FIDAA HEE
माझ्यावरी फिदा ही माझी गझल दिवाणी ती तोलते मलाही आहे किती शहाणी मी पाझरे अताशा हलक्याच चाहुलीने हृदयात अमृताच्या आहेत कैक खाणी दचकून जाग आता मजला कधी न येते असते सदैव जागी माझ्यात एक राणी अफवाच पेरती ते त्यांचेच पीक घेती असली पिके विकाया लिहितात ते कहाणी माझी-तुझ्यातली ही प्रीतीच तारणारी गोष्टीतुनी खळाळे मम प्रेमरूप…