Category: Marathi kaavya

  • ती साद माउची येता – TEE SAAD MAAUCHEE YETAA

    ती साद माउची येता थरथरली काया सुंदर गझलेच्या वृत्तामधुनी सळसळली काया सुंदर जो उपजत फुलून आला तो अभिनय खराच होता श्वासाला रोखुन धरता झरझरली काया सुंदर भावना दाटुनी आल्या लेखणी हरवली होती पण जवळ संगणक बघुनी टपटपली काया सुंदर वादळी रात अवसेची घनमाला पिसाटलेल्या त्या रात्री वीज बनोनी लखलखली काया सुंदर मी फक्त ‘सुनेत्रा’ आहे…

  • सोनार कुशल मी झाले – SONAAR KUSHAL MEE ZAALE

    सोनार कुशल मी झाले दागिन्यात मढण्यासाठी अन पाथरवटही झाले मूर्तीस घडविण्यासाठी धगधगत्या ज्वालेमध्ये काहिली तनूची होता मी रान जिवाचे केले पावसात भिजण्यासाठी दगडाच्या भावामध्ये विकताना पाहुन रत्ने मी रत्नपारखी झाले अंगठ्या बनविण्यासाठी घामाने शिंपित गेले कागदी मळा काव्याचा थंडीत बोचऱ्या फिरले घामास जिरविण्यासाठी मज घाम पुसायालाही सवड ना मिळाली जेव्हा ते निरखित मज बसलेले दोषांना…

  • घन तोडे कनक कळ्यांचे – GHAN TODE KANAK KALYAANCHE

    घन तोडे कनक कळ्यांचे हातात सखीच्या सुंदर जणु कळ्या जुईच्या पिवळ्या गजऱ्यात सखीच्या सुंदर पाण्यावर शीतल निर्मल दो भावकळ्यांच्या वाती लखलखत्या दीपक ज्योती नयनात सखीच्या सुंदर गझलेतुन सळसळणारी श्वासातुन दरवळणारी प्रीतीची अमृतगाथा हृदयात सखीच्या सुंदर ती हसते तेव्हा गाली रुततात गुलाबी मोती कुंडले जपेची डुलती कानात सखीच्या सुंदर तू सांगशील का आता तव हृदय चोरले…

  • रत्नांच्या खजिन्यामधले – RATNAANCHYAA KHAJINYAA-MADHALE

    रत्नांच्या खजिन्यामधले मी रत्न अलौकिक बाई मम पुत्ररत्न झळझळते खणखणते पौरुष आई ही कन्या सात्विक माझी जणु माधुर्याची पुतळी बघ सान असोनी बनली वाटण्यास सौरभ ताई त्या आखिव गावामध्ये मूढांना पाणी पाजे तो भाऊ माझा तगडा आहेच अतिवीर भाई तोलण्या गुणांना दैवी ती सत्त्वपरीक्षा देते तेलात उकळत्या पडते ही इवली नाजुक राई पाण्यात पाहुनी मजला…

  • सांज चालली निवांत – SAANJ CHAALALEE NIAANT

    अंगणास सारवीत सांज चालली निवांत सौख्यरूप सावलीत ऊन बैसलेय शांत चैत्रवेल गारवेल कुंपणास बिलगलीय चंद्रकिरण प्राशतोय चिंब चिंब चंद्रकांत चांदण्यास पाखडे निशा बसून अंबरात रातराणि सजुन जाय दागिन्यात नखशिखांत पसरता उषा-प्रकाश काजवा निघे घरास पारिजात टपटपेल साद घालता निशांत चंचलेत चामरात कामिनीत भामिनीत काव्य-वाटिकेत मुक्त बहरलाय काव्यप्रांत वृत्त – चंचला, मात्र २४ लगावली – गा…

  • एकदाच फक्त सांग – EKADAACH FAKT SAANG

    एकदाच फक्त सांग माझियात काय खास मापट्या समान नाक की सुडौल पाय खास पात हरित करकरीत सळसळे खुल्या उन्हात जणु उनाड चंचला म्हणे सुरात हाय खास भाज पात फोडणीत लाल तिखट मीठ वरुन डाळ घाल पीठ पेर आर्द्रता भराय खास अक्षरात इंग्रजी सजेल गझल घाटदार त्यात मस्त झेड केंद्र गुप्त एक्स वाय खास तेहतीस कोट…

  • काफिया रदीफ खास – KAAFIYAA RADEEF KHAAS

    काफिया रदीफ खास वेगळीच गझल आज वृत्त तेच चंचलाच पण सुखांत आज बाज लाट लाट उसळताच खळखळे भरात नाद हा समुद्र भावभोर अंतरी उधाण गाज सोडलेस तू जलात तारु स्वैर वादळात धीर मी न सोडलाय सोडलेन कामकाज ओहटीत नीर शांत शारदीय चांदरात मौन सोड बोल भांड पैंजणे बनून वाज वीर नार देतसे समुद्र देवतेस अर्घ्य…