-
पाहते का अशी – PAAHATE KAA ASHEE
पाहते का अशी मज गझल रोखुनी चूक शोधू नको वृत्त हे स्त्रग्विणी तीक्ष्ण दृष्टी मला लाभता तव कृपे काफिये मी असे निवडते चाळुनी मोकळे ढाकळे बोलुया भांडुया हेच मी सांगते संयमी राहुनी गुंफिते शब्द मी शुभ्र हे शारदे चरण तव स्पर्शिते लीन मी होउनी ज्ञानधारा खिरे सूक्ष्म छिद्रातुनी चिंब मज व्हायचे या जली न्हाउनी स्त्रग्विणी…
-
तापता गोठता – TAAPATAA GOTHATAA
तापता गोठता अंबरी पीर हे मेघमालेतुनी बरसले नीर हे वारियाने उडे पल्लवी तीक्ष्ण ही माधवी वल्लरी उधळिते तीर हे हारणे ना अता ध्यास हा लागता जिंकण्या त्यागिती मीपणा वीर हे पूर्ण तो चंद्रमा हासता विहरता सांडते भूवरी चांदणी क्षीर हे रक्षिण्या मायभू बांधवा आपुल्या सोडुनी शत्रुता ठाकले मीर हे चूक मम व्हावया खूप घाई नडे…
-
माय माझी – MAAY MAAZEE
-
रंगलेल्या नभी – RANGLELYAA NABHEE
रंगलेल्या नभी सूर्य नारायणा अर्घ्य देण्या तुला ताठ माझा कणा पेल हाती ध्वजा लाव कळसावरी शुद्ध आहे तुझी भावना धारणा साठलेले जळी प्रेम गंधाळले उघड आता खऱ्या अंतरीच्या खणा सर्प मित्रांसवे केतकीच्या बनी नाग चिंतामणी डोलवीती फणा वाहिले तू पुरे काव्य हृदयातले उपट डोक्यातल्या माजलेल्या तणा पुस्तके वाचुनी लेक झाली गुणी लोकगीते तिची रेशमी झोळणा…
-
स्रग्विणी वृत्त जाणायचे – STRGVINEE VRUTT JAANAAYACHE
स्रग्विणी वृत्त जाणायचे आज तू गालगा चारदा गायचे आज तू गालगा गालगा गालगा गालगा हे लगावून वाचायचे आज तू गालगागा लगा गाल गागालगा वेगळे सूर ही द्यायचे आज तू गाल गागालगा गालगागा लगा यातही कोंबुनी घ्यायचे आज तू मी ‘सुनेत्रा’ मला ना यशाची नशा चिंब प्रेमामधे न्हायचे आज तू स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगा गालगा गालगा…
-
आज माझ्यासवे – AAJ MAAZYAASAVE
आज माझ्यासवे गझल होशील तू कृष्ण मेघांपरी सजल होशील तू वेड मोठे जरी सहज पेलेन मी साथ देण्या मला तरल होशील तू संगतीने तुझ्या काव्य आले घरी शब्द-चित्रातले नवल होशील तू वाट पाण्यातली सुगम होईल रे देठ होईन मी कमल होशील तू प्रेम सौख्यामधे चिंब भिजणार मी जाळण्या वासना अनल होशील तू स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः…
-
भौ – BHOU (BROTHER)
सत्वरी आगळे वृत्त दे भौ मला स्त्रग्विणीचा घडा घाट साकारला सांग घोळू किती यात वृत्ती पिशी तोडुनी जोडुनी तोल सांभाळला सावळी मूर्त मी लाजुनी जांभळी रंगुनी रंगली देह झंकारला गोष्ट माझी तुझी साद घाली जगा नाद वेडा खुळा जीव नादावला पंचप्राणातली प्रीत उधळेन मी पंच भूतांसवे येच नाचायला स्त्रग्विणी (अक्षरगणवॄत्त) लगावलीः गालगा गालगा गालगा गालगा…