-
कालसर्प कुंडलीत – KAAL-SARP KUNDALEET
कालसर्प कुंडलीत त्यास फक्त ठेचणार जो असेल देवळात त्यास नित्य पूजणार बंगल्यात झोपडीत जर फिरे भुजंग साप सर्पमित्र होत त्यास वाटिकेत धाडणार केवडा बनात नाग मस्त राहती निवांत नागिणींसवे तिथेच ते मजेत डोलणार माणसे भिऊन त्यास तो भिऊन माणसांस छेडल्याविना कुणा कधीन सर्प चावणार श्रावणात पंचमीस वारुळास जाय पोर त्या अजाण बालिकेस शिक्षणास जुंपणार वृत्त…
-
चालतेस चंचले – CHAALATES CHANCHALE
-
खास मी – KHAAS MEE
हसेन चंद्र होउनी स्मरेन मधुर तेच मी हवा जरी मुकी मुकी दवाळ कुंद पुष्प मी पुन्हा पुन्हा लिहावयास गझल धुंद नाचरी उधाणता समुद्र लाट गाज मुक्तछंद मी असेल वृत्त बंद वा ललित सलिल झऱ्यापरी रदीफ काफियासवे भरेन त्यात प्रीत मी सतेज बिंब लोचनात पाहुनी निळे निळे सखे झरेन पापण्यांत तृप्त मुग्ध थेंब मी गुरूकुलात मंदिरात…
-
लाठी – LAATHEE
लिही आता बरे काही स्वतःसाठी दुजासाठी लिही थोडे उकलणारे नको मारू फुका गाठी कशाला हा हवा गुंता शिरी लागे गझल भुंगा पुरे झाले अरे भुंग्या नको लागू सदा पाठी कशासाठी गुरे येती कषायांची निवाऱ्याला असे वाटे तयांपाठी उगारावी कलम काठी पुरे आता छुप्या गोष्टी उताराचे वयच खोटे जवळ येई हळू साठी म्हणोनीरे बुद्धी नाठी खरे…
-
वृषभ – VRUSHABH
-
वियदगंगा – VIYAD GANGAA
-
गुज-गोष्टी – GUJ- GOSHTEE
मनाची चाल मोठी मनाला पंख वाऱ्याचे किती स्वप्ने तुझी आई तुझे आभाळ ताऱ्यांचे कुठे असशील आता कोण सांगेल मज गुज-गोष्टी किती गझला तुझ्यासाठी मला मोल तव चाऱ्याचे कशाला रे तुला शेती हवी बागायती माझी हवी तर मग भरावे तूच पैसे शेतसाऱ्याचे पुरे झाले बहाणे लाडक्या ओलांड सीमेला नको कौतुक मला सांगू नजरभेटी नजाऱ्यांचे किती थोतांड…