-
जलदमाला – JALAD MAALAA (An array of water clouds)
फुला-पाखरांचे थवे गात आले मनाचे गुलाबी गडद पान झाले पुन्हा झिंग येण्या तशी जांभळी ती हळदुली उन्हाने भरूयात प्याले पुरा-वादळाच्या तडाख्यात काळ्या लव्हाळीपरी तृण झुकूदेत भाले झरा पीतवर्णी प्रभाती झळाळे दिशांचे फिकुटले वसन हे उडाले मृदुल पाकळ्यांवर दवाचा फुलोरा जसे कर्पुरांचे निळे दीप झाले दुपट्ट्यात हिरव्या हसे मुग्ध चाफा सुगंधात ओल्या मयुर चिंब न्हाले थिटी…
-
पूर्ण भरावे – “to fill out completely”
-
सत प्रेमांकुर – “the shoot of divine love”
किती किती मी आहे सुंदर माझ्यासाठी गाते अंबर माझा अभिनय माझी काया हृदयी रुजवी सत प्रेमांकुर जीवांच्या कल्याणासाठी वेड्यासम हा माझा संगर क्षमा करा मज प्रिय बंधूंनो तुमच्यासाठी फोडिन कंकर तुमची पूजा हृदयापासुन नका ढळू चालीने मंथर मुग्ध फुलांचे भाव निरागस टिपते हे रुणझुणते झुंबर काळिज माझे सदा दक्ष हे जिनानुयांचे जपण्या अंतर प्रेमच मम…
-
सोनचाफा – golden champak
बेधुंद होउनी तू हा माळ सोनचाफा हृदयात तव मनीचा सांभाळ सोनचाफा अलवार भावनांनी तलवार देह होता प्रसवेल गीत रमणी ओढाळ सोनचाफा आहेच सुंदरी मी वेडात बोलता मी काढेल खोड पुन्हा नाठाळ सोनचाफा काढू नकोस अर्का टिकवून ठेव रंगा जाळीतुनी धुक्याच्या तू गाळ सोनचाफा झोपून मस्त रात्री झाले पुन्हा तवाने पडते मजेमजेने हे बाळ सोनचाफा वृत्त-…
-
आस धर तू – stay hopeful
-
काटवट कणा – wooden platter game of women
-
प्रीतीसंगम – “confluence of love”
कऱ्हा असूदे अथवा नीरा नीर तिच्यातील स्वच्छ वाहूदे प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे काठावरती मळे फुलावे हिरवे हिरवे ऋतू सजावे कणसामध्ये भरोत दाणे झुळूक गात वाहूदे प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे नद्या “न करिती पर्वा याची कोण पिकविते काय जलातून देत राहती विनाअपेक्षा काही कुणी म्हणूदे प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे अंतर…