Category: Marathi kaavya

  • असे झाले – ASE ZAALE

    लालका गाल हे असे झाले चुंबिता भाल हे असे झाले सूर ना लागला लय खरी पण सोडता ताल हे असे झाले कारवां चालला दुज्या गावा उठविता पाल हे असे झाले स्पर्शिता थरथरे किती काया आज ना काल हे असे झाले तिजसवे झिंगले खरे वेडे पाहुनी चाल हे असे झाले वृत्त -लज्जिता, मात्रा -१७ लगावली –…

  • भुई नाचे – BHUEE NAACHE

    सावळी सावळी भुई नाचे त्यावरी वल्लरी जुई नाचे पाच बोटांवरी बसोनीया सान कैरीतली कुई नाचे वस्त्र आहे जरी भरड त्यावर होत मागे पुढे सुई नाचे मेघना दामिनी कडाडे अन मस्त तो मोर थुइ थुई नाचे वारियाने उडे झुले धावे स्वैर ती रानची रुई नाचे वृत्त -लज्जिता, मात्रा -१७ लगावली – गा ल गा/गा ल गा/ल…

  • धरण – DHARAN

    पूर्ण भरता धरण आसवांचे ऊन्ह करते हरण वासनांचे अंबरी विहरता मेघमाला रान वाटे जणू मोतियांचे चुंबिता वात तो घन घनांना वीज माळे तुरे तारकांचे शीत धारांसवे धावताती जलद हे भूवरी भावनांचे तृप्त होता धरा जीवसृष्टी पीक येई नवे चांदण्यांचे वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल गा गा

  • आस आहे – AAS AAHE

    बोलती कावळे आस आहे कोणती नाकळे आस आहे काक ना स्पर्शिती पिंड जेव्हा सांगती बावळे आस आहे पाहती चोरुनी जे नको ते ते जरी सोवळे आस आहे मंदिरी अंतरी ज्योत तेवे भिंत का काजळे आस आहे आवळे वाटुनी चोरलेले लाटती कोहळे आस आहे वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल…

  • कोन – KON

    सांग गझला कशाने लिहू मी हात मिटला कशाने लिहू मी धारना राहिली लेखणीला टाक पिचला कशाने लिहू मी प्राशुनी नीर सारे नदीचे पेन फुटला कशाने लिहू मी पेलता दो करी जड धनूला बाण सुटला कशाने लिहू मी नाव मेंदीतले रेख म्हणशी कोन तुटला कशाने लिहू मी वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल…

  • माकडे – MAAKADE

    तीनही लाजली माकडे माणसे जाहली माकडे लाजणे भावले रे मला लाजता भावली माकडे वाकुल्या दाविती बालके जाणुनी नाचली माकडे तोतये दाबिती जेधवा तापुनी कावली माकडे जोंधळा सांडता भूवरी चांदणे प्यायली माकडे अंतरी गाजता लाटही अंबरी पोचली माकडे तू सुनेत्रांस दो चुंबिता खेळुनी झोपली माकडे वृत्त – गा ल गा/गा ल गा/गा ल गा/ (वीरलक्ष्मी)  …

  • मज मना – MAJ MANAA

    मज मना लाजणे आवडे पापण्या झुकविणे आवडे राग तो गिळुनिया अंतरी अधर तव दाबणे आवडे कावरी बावरी लोचने चोरुनी वाचणे आवडे हृदय तू बंद केले जरी त्यात मज राहणे आवडे मी समोरी असोनी तुझ्या आडुनी पाहणे आवडे टोमणे मारणे बासना मज मधुर बोलणे आवडे दे सुनेत्रा गझल नित नवी त्यात मज डुंबणे आवडे वृत्त –…