-
सर्व कळव – SARV KALHAV
शब्द फिरव वही भरव पटापटा धुणे बडव काना दे नीट गिरव मात्रांना अचुक बसव जमीन कस पालं उठव खण खड्डा परत बुजव पुष्पांनी देह सजव कवितेने हृदय फुलव सुनेत्रास सर्व कळव मात्रावृत्त – ६मात्रा
-
मंगल मंगळ – MANGAL MANGALH
मंगल मंगळ नकोच कलकल चिखलच मलमल कमळे श्यामल वारा शीतल पांघर वाकळ उघडे कातळ पुष्पे कोमल मात्रावृत्त – ४ मात्रा
-
भांडीभांडी – BHAANDEE BHAANDEE
भांडीभांडी अन भांडीकुंडी चल भर प्यान पॉट कळसा गिंडी गंजात पाणी भरून ठेव गो प्यायाला येइ साजुक देव घो कामं किती वरी करून राह्यले तरी तुझे ना तेरा गं वाजले गाडग्यात आंबिल रटरट शिजतंय दुधाचं लोटकं भरभरुन सांडतंय संगती घेऊन सुंदर कोष्टी ये ग ये सई सांगाया गोष्टी छप्पापाणी नी सागरगोटे खेळू बिगी बिगी होऊ…
-
लेटर्स – LETTERS
पी पी ‘पिकॉक’ चा यू यू ‘यूज’ चा बी बी ‘बिस्लेरी’ चा एल ‘एलजी टीव्ही’ चा आय आय ‘आयकॉन’ चा सि सि ‘सिनेमा’ चा ए ए ‘एम’ चा टी टी ‘टी’ चा आय पुन्हा ‘आयन्स’ चा ओ ओ ‘ओशन’ चा एन एन ‘एनसीसी’ चा एस एस ‘एसएमएस’ चा कित्ती ‘लेटर्स’ च्या गाडीचा इंजिन ड्रायव्हर तोडीचा…
-
तू अन मी – TOO AN MEE
अता तुझी ना आठवण येते तुझ्यात दडल्या अनेक ‘तूं’ची कधीकधी पण आठवण येते नकळत झाली भेट तरीही नजर भिडविली कधी जरीही आठवुन ना पण धडधड हृदयी केव्हातरी मी तुजला बघते अता तुझी ना आठवण येते नाजुक साजुक गुपिते गोष्टी उघडुन मम प्रेमाची सृष्टी कधी न होते दुःखी कष्टी सत्य कळावे फक्त वाटते अता तुझी ना…
-
तो कुरुप – TO KURUP
तो कुरुप एकदा भेटावा मजला पाहीन त्यास मी लाजेने भिजला तो लाज लाजता बघेन त्या मायेला विसरण्या जगाला अन मायेला त्याच्या ती भांडेवाली चिडव चिडवते त्याला त्या मायेची अन त्याची गट्टी फू होण्याला तो कुरुप एकदा भेटावा त्यांना समजती स्वतःला देखणे पान तयांना पुरती जिरली सर्वांची बघ आत्म्या पळाले दूर ते सारे सोम्या गोम्या
-
जीवा – JEEVAA
बगिच्यात रमावे वाटते माझिया जीवा वाऱ्यात फिरावे वाटते माझिया जीवा रंगात भिजावे वाटते माझिया जीवा प्रेमात बुडावे वाटते माझिया जीवा आत्म्यास कळावे वाटते माझिया जीवा झुळूकीत वहावे वाटते माझिया जीवा संगीत बनावे वाटते माझिया जीवा झोक्यात झुलावे वाटते माझिया जीवा पानात फुलावे वाटते माझिया जीवा जीवनी हसावे वाटते माझिया जीवा गगनात उडावे वाटते माझिया जीवा…