Category: Marathi kaavya

  • बात खरी – BAAT KHAREE

    स्वभाव जुळता दोन जीवांचे जुळे कुंडली आपसूक विचार जुळता दोन घरांचे जुळे कुंडली आपसूक मानपान अन देणेघेणे देऊ फाटा साऱ्यांना देवापुढती झुकवुन माथा अर्थ देउया नात्यांना बाह्यरूप अन पैशाहुनही महत्त्व आहे प्रेमाला दोघांमध्ये लुडबुड करण्या नकोच संधी पाप्यांना प्रामाणिक राहूनच टिकवा नात्यांमधला नवेपणा स्वाभीमानी जीवन जगण्या ताठ राहुद्या नित्य कणा अंतर मिटवा अंतरातले जपा अंतरी…

  • व्हय व्हय -VHAY VHAY

    काय लिवायचं कसं लिवायचं प्रश्न नाही पडत आता लिव लिव म्हणताच आम्ही लिवत सुटतो खाता पिता शब्द टाकत अर्थ लावत भाव करत वजन बघत लिव लिवतो सटा सटा मग परत तुमच्या चवकश्या पुन्हा आमच्या उठाबश्या असंच का तसंच का म्हणायचं म्हणायचं परत परत तरीसुद्धा लीवच म्हणायचं अपुनबी व्हय व्हय म्हणायचं व्हाय व्हाय नाय म्हणायचं गालभर…

  • लिहीन लिहीन – LIHEEN LIHEEN

    लिहीन लिहीन काही पण लिहीन पण लिहीनच लिहीन लिहीत राहीन लिहीत राहीन जमेल तोवर लिहीतच राहीन सुचेल छान छान मस्त मस्त ते ते सारे लिहित राहीन कशाला थांबू कशाला अडखळू उगाच अडखळून पडू बिडू सापडतील ते शब्द घेईन ओळींची गाडी पुढेच नेईन झुक झुक झुकाक धावत राहीन इंजिन बनून शिट्टी घालेन हवेत धूर नाही वाफ…

  • पुन्हा धबधबावे – PUNHAA DHAB DHABAAVE

    अता मी लिहावे अता मी पुसावे फिरूनी कुरूपा अचुक मी टिपावे खऱ्या पावसाला असा जोर येता पुन्हा प्रेमस्मरणी मजेने रमावे धरा चिंब झाली झरा वाहतो हा तयातील पाणी मनी साठवावे निळे मेघ आता किती कृष्ण झाले तयांसारखे मी अता मुक्त व्हावे अशी ये समोरी मला सत्य म्हणते कधीची उभी मी तया ते कळावे नदी आटलेली…

  • सर्व कळव – SARV KALHAV

    शब्द फिरव वही भरव पटापटा धुणे बडव काना दे नीट गिरव मात्रांना अचुक बसव जमीन कस पालं उठव खण खड्डा परत बुजव पुष्पांनी देह सजव कवितेने हृदय फुलव सुनेत्रास सर्व कळव मात्रावृत्त – ६मात्रा

  • मंगल मंगळ – MANGAL MANGALH

    मंगल मंगळ नकोच कलकल चिखलच मलमल कमळे श्यामल वारा शीतल पांघर वाकळ उघडे कातळ पुष्पे कोमल मात्रावृत्त – ४ मात्रा

  • भांडीभांडी – BHAANDEE BHAANDEE

    भांडीभांडी अन भांडीकुंडी चल भर प्यान पॉट कळसा गिंडी गंजात पाणी भरून ठेव गो प्यायाला येइ साजुक देव घो कामं किती वरी करून राह्यले तरी तुझे ना तेरा गं वाजले गाडग्यात आंबिल रटरट शिजतंय दुधाचं लोटकं भरभरुन सांडतंय संगती घेऊन सुंदर कोष्टी ये ग ये सई सांगाया गोष्टी छप्पापाणी नी सागरगोटे खेळू बिगी बिगी होऊ…