-
गटारी – GATAAREE
आली पुन्हा गटारी आता धुवा गटारी काढून गाळ कचरा झाडून घ्या गटारी येता अवस दिव्याची लावा दिवा गटारी प्याल्यात गझल बघुनी हसती पहा गटारी मद्यालयास टाळा लावे नवा गटारी वृत्त – गा गा ल गा, ल गा गा.
-
खापरतोंड्या – KHAAPAR TONDYAA
खापरपणती ढोपरआज्ज्या म्हणती नातवा नको छळू वृद्ध जाहलो खापरतोंड्या तुझ्यामागुनी किती पळू खापरखापर नातू नाती नावे पाडुन तुज थकल्या खापरढोपर आज्जा होउन नकोच वाती अता वळू सदैव उघडे तोंड तुझे हे मीट पाडण्या बत्तीशी पापांकुर तव मुखात शिरण्या पहा लागले इथे वळू जरी चावडी दिलीस आंदण धुण्यास कट्टा नीर नसे भळभळणाऱ्या जखमासुद्धा झरू लागल्या किती…
-
तरीही – TAREEHEE
भर बाराची वेळ तरीही कोकिळ ताना घेय तरीही कुठे कावळा क्रो क्रो करतो जुनाट वाहन वेग तरीही चिकचिक दलदल अवती भवती खातो कोणी भेळ तरीही शिट्टी वाजे कुठे कुकरची शिजे चुलीवर पेज तरीही कार कुणाची पुढे न जाते उघडे आहे गेट तरीही पदर उडे हा वाऱ्यावरती कुणी पकडते शेव तरीही माप सुनेत्रा तुझेच असली शेवटचा…
-
बेला सुंदर – BELAA SUNDAR
सांज समय बेला सुंदर उजळ आत्मियाचे मंदिर निरांजनी तूप स्नेह पूर्ण त्यात भिजव वात पेटवून शुभ्र ज्योत णमोकार मंत्र म्हणत भजन म्हणू खास खास विरण्यास भ्रम भास चित्त ठेव चैतन्यात कैवल्याच्या चांदण्यात डुंब ज्ञानसागरात रमव मन दर्शनात सांज समय बेला सुंदर रम्य आत्मियाचे मंदिर
-
शेम शेम – SHAME SHAME
प्रेम-लग्नात हुंडा-बिंडा, हे कसलं प्रेम लग्नाआधी देह-संबंध, म्हण शेम शेम उलटी टीप अन धावदोरा, इथे न चाले पिको यंत्रास बाजुला ठेव, घाल बरं हेम मराठी खरी दिलदार परी, इंग्रजी म्हणे “आली आली” म्हणता म्हणता, करे “कम केम” माय मऱ्हाटी बहिणाबाई, कानडीचीगं कन्नड मराठी सीमेवरी, बोलुया सेम गुजरांचा केम छे केम छे, सर्वांना कळे आट खेळ…
-
कालसर्प – KAAL SARP
राहू-केतू कुंडलीतना मनात अपुल्या आहे कालसर्प हा पत्रिकेतना विकृतीत आहे कशास पूजा निवारणाला दोष मतीतच आहे सम्यकत्वी जो असतो त्याला वीष न असले चढते मिथ्यात्वाचे पालनपोषण अज्ञानाने होते अज्ञानाला दूर करूया धर्म खरा जपण्या सम्यकज्ञानी शूर वीरांची चारित्र्ये फुलण्या
-
कॅमेरे – CAMERE
बास झालं लिहिणं बिहिणं चल आता हुंदडायला अंगणातल्या झाडावरचे पिवळे गुलाब मोजायला उमलते गुलाब टपोऱ्या कळ्या खिदळतात हसतात वेड्या खुळ्या डोळ्यांचे कॅमेरे दोन दोन फुलांचे फोटो घेतंय कोण हिरव्या पोपटी पानांवर गुलाबाच्या गालिच्यावर प्रेम तुझं नि माझं हसतंय पाकळी पाकळ्यांवर तेवढ्यात आल्या कित्ती बाया साळकाया अन माळकाया फुलं तोडून पसार झाल्या माझं हसू घेऊन गेल्या…