-
पाउस सरी – PAAOOS SAREE
रिमझिम झिमझिम बरसत वर्षत याव्या पाऊस सरी नाचत खिदळत अंगावरती घ्याव्या पाऊस सरी टपोर मौक्तिक जलदांमधले स्वप्नपरी वेचीते ओंजळीतुनी नाजुक तिचिया याव्या पाऊस सरी मेघ गडगडे वीज कडकडे राग गातसे भूमी मृद्गंधाशी करीत गप्पा गाव्या पाऊस सरी प्राजक्ताचा सुवास ओला भरून देहामध्ये ओलेत्या पण चिंब भिजाव्या न्हाव्या पाऊस सरी तप्त बाष्पयुत शुभ्र मेघना थंड होतसे…
-
कविता – KAVITAA
कविता असुदे वाकडी अथवा सरळ किंवा वेलांटीदार वळणा वळणाची ! तिचं वाकडेपणसुद्धा कधी कधी जपावं ! तिचं सरळपण साधावं तिची मोहक वेलांटीदार वळणे आपणही घ्यावीत… वेलांटीत वाकावं, उकारात उडावं ! काना मात्र्यात टिपावं चिंब भिजलेलं मन ! मग नकळत हसावं विसर्गात अधर किंचित वक्र करून ! कविता असतेच एक हलकी मोळी गझल वृत्तात बांधल्यास होते…
-
बिजली बाला – BIJALEE BAALAA
मीही घडले तीही घडली तोही घडला हाही घडला … आपण घडलो घडले सारे कधी पडताना घडले मीरे दिवसा मोजीत होते तारे ! भिजवून गेले सुगंध वारे अशीही घडले तशीही घडले घडता घडता कधी बिघडले ! हमसून हमसून मीही रडले… पिंजऱ्यातले बंद हुंदके फुटल्यावरती मौक्तिक बनले नक्षत्रांची नव्हती माला नव्हता मृग अन चित्रा स्वाती ! तरीही…
-
लिहावी सुंदर गझल! – LIHAAVEE SUNDAR GAZAL!
लिहावी सुंदर गझल ! सुंदर कविता, सुंदर कथा, सुंदर समीक्षा ! स्वतःसाठी! कधी दुसऱ्यासाठी ! कधी तिसऱ्यासाठी ! तर कधी सर्वांसाठी ! मोकळ्या मनाने लिहित जाल स्वतःसाठी तर आपोआपच लिहित जाल सर्वांसाठी !
-
वहीचं पान – VAHEECHA PAAN
वहीचं पण स्वच्छ सुरेख; आखीव आणि रेखीव ! लिहित असते काहीबाही त्यावर मुक्त! कधी बांधीव! विचार, भावना, बुद्धी यांचं तयार होताच एक अनोखं रसायन हृदयातून झरझर बरसायला लागतात शब्द शब्द ! शब्द उमटत जातात बोटांमधून कागदावर पानावर ! त्याची कधी होते कविता कधी होते कथा कधी गझल कधी ललित ! लिहिता लिहिता काहीबाही सुंदर सुद्धा…
-
आपणच लिवायचं – AAPANACH LIVAAYACHA
आपणच लिवायचं आपलं नशीब आपणच लिवायचं चांगलं वागायचं ! ते नसतं लिहिलेलं तळहातावर किंवा तळपायावर ! कपाळावर सुद्धा नाही दुसरा कोणी लिहीत आपणच लिहितो आपलं विधिलिखित ! आजच आज लिहा उद्याच उद्या ! दुसरा कोणी बसलाच तुमच नशीब लिहायला तर टाकाकी खोडून मर्दांनो आणि मर्दिनिंनो टाका त्यांनी लिहिलेला कागद फाडून आणि लिहा स्वच्छ हातानं निर्मल…
-
सारेच पार – SAARECH PAAR
काय केलं आम्ही, सांगा तरी आम्हाला? मानभावीपणाने पुसता तुम्ही कोणाला? काय केलं तुम्ही? हे तुम्हाला माहिती आणि … आम्हाला माहिती! कशाने तोंडाने बोलावी बोलती? भोगतील ते , आम्ही आणखी कोणी आणि तुम्हीसुद्धा ! कर्माची फळे कधीना कधी अगदी योगायोगानी! जाऊदेहो आता कशाला करू मी व्यर्थ काथ्याकूट ? गाठलंय केव्हांच माझं मी कूट ! ज्यांनी ठेवला…