Category: Marathi kaavya

  • चाळिशी – CHAALISHEE (forties)

    गाठलीस बघ सव्विशि पुरे अता कर चौकशी खुशाल दाखव बत्तिशी जरी गाठली छत्तिशि हसण्या खाण्या चौतिशी काजूकतली पस्तिशी झाल्यावरती चोविशी मूढ गद्धे पंचविशी आली आली चाळिशी कशास चष्मा टाळशी मात्रावृत्त (८+५=१३ मात्रा)

  • हरिण-कस्तुरी – HARIN-KASTUREE(musk deer)

    दवबिंदुंचे उदक साठवुन सहाण भरली हसली काष्ठ चंदनी फिरता वरती फूल सुवासिक बनली बनी केतकी नागिण फिरते सळसळणारी चपला कैद कराया तिज बुंध्याला बिजलीने कंबर कसली पुष्पपरी मी उडेन आता म्हणत म्हणत ती पडली मृद्गंधित घन मातीमध्ये लोळुन लोळुन दमली चपळचंचला संयमधर्मे उडून जाता स्वर्गी नागफण्यासम श्यामल सुंदर वीज नभी लखलखली वनहरिणी ती ऐकत गाणे…

  • काट्यास काढतो मी – KAATYAAS KAADHATO MEE (I will remove the obstacle)

    शुन्यात पाहतो मी पुण्यात डुम्बतो मी प्राचीवरी उगवुनी शुक्रास शोधतो मी सायीस मस्त घुसळुन लोण्यास काढतो मी अश्रूतल्या मिठाला नक्कीच जागतो मी तव भावनेस सप्पग लवणात घोळतो मी सलतो तुला सदा त्या काट्यास काढतो मी सारे फितूर वारे पंख्यात डांबतो मी होऊन कृष्ण काळा गाईंस राखतो मी सांजेस केशरीया रंगात माखतो मी वृत्त – गा…

  • टमाटे – TAMAATE (tomatoes)

    आज टमाटे संपव तू चित्र नव्याने रंगव तू वहीवरी जे लिहिशी ते अक्षर अक्षर टंकव तू द्वेषाचे अन भोगाचे शिल्प बुभुक्षित भंगव तू वासनेत ती बुडे जरी प्रेमाने तिज गंडव तू तापवणाऱ्या डोक्यांना सतत बोलुनी भंडव तू घाण साठता कोंड्याची पूर्ण कुंतले मुंडव तू सम्यकदर्शन होण्याला आत्मियात तिज गुंगव तू नकोस टाळ्या टाळ पिटू गझली…

  • म्हण गाणे वा पाढे तू – MHAN GAANE VAA PAADHE TOO (you sing songs or say tables..)

    म्हण गाणे वा पाढे तू दूध वीक पण गाढे तू म्हणता साडे माडे तू ‘मी’ला जेवण वाढे तू जरा कुठे बघ बरे घडे भांडण उकरुन काढे तू बील द्यावया खरे खरे अचुक मोजरे खाडे तू मनात मीपण ताठ जरी अंगण वाकुन झाडे तू हाती नाही माध्यम पण क्षणात सारे ताडे तू अर्धे पक्के चावुन खा…

  • बदाम आंबा – BADAAM AAMBAA (heart shaped mango)

    चोखुन चोखुन आंबा खा चवीत पुरता बुडून जा आंबा आहे भलता गोड त्याच्याशी तू नाते जोड कर योगा अन होना रोड नाद जीमचा आता सोड नकोस ठेवू भीड नि भाड मुजोरड्यांना पाडच पाड पाण्यामध्ये होडी सोड पुरव जिवाचे कौतुककोड होशील आता मालामाल हंसासम डौलाने चाल नको घाबरू वळणांना वळणावरच्या थांब्यांना हवा कशाला तुज थांबा तू…

  • ओझेबीझे फेकुन देते – throwing away burdens

    गझल काफिया रदीफ गातो माझ्यासंगे शरीफ गातो उत्सव असुदे अथवा जलसा तीन दले धर्माला पळसा गजल लिहावी अथवा कविता शुद्ध जले वाहूदे सरिता गझल गझाला गज्जल असुदे नीर तयातिल नीतळ असुदे साळुंकी वा म्हण साळुंखी फक्त जाण तू तो तर पक्षी सुंदर देही सुंदर आत्मा हेच सांगते गाता गाता गाणे गाता बाग फुलावी शिंपुन केसर…