Category: Marathi kaavya

  • ऊठ मुला – wake up my boy)

    ऊठ मुला जागा हो सत्वर तुला जायचे बघ कामावर विधी आटपुन भल्या पहाटे प्रसन्न ताजे तुजला वाटे करून कामे लवकर लवकर घरास ये तू बनून अवखळ आनंदाने हसत राहशिल जीवन जगण्या फ़ुलशिल खुलशिल आता ना मज कुठली चिंता आत्म्यामध्ये तू भगवंता

  • धर्म दिगंबर जैनांचा – digambar jain relegion

    टिकेल आता येथे सुंदर धर्म दिगंबर जैनांचा देवघरातिल बोले झुंबर धर्म दिगंबर जैनांचा गातो पक्षी झुळझुळ वारे वाजे पावा कृष्णाचा पृथ्वीसंगे गाते अंबर धर्म दिगंबर जैनांचा तीर्थ बनविले अरिहंतांनी मार्ग दाविण्या आम्हाला आदिनाथ वा असुदे शंकर धर्म दिगंबर जैनांचा जीवांमधली ठिणगी फुलण्या सदासर्वदा दक्ष रहा जमेल तितुकी घाला फुंकर धर्म दिगंबर जैनांचा लेन्स असूदे अथवा…

  • खरेच आहे – it is true

    बुडत्याला आधार काडिचा खरेच आहे मला वाटते जुने लिहावे बरेच आहे स्वभाव अपुला आपण जपतो असेच आहे आत्मा म्हणतो जे आहे ते तुझेच आहे श्वान भुंकतो कारण त्याचे तेच बोलणे रोज भुंकणे जरी तेच ते नवेच आहे बाळ बोबडे बोले काही खिदळत नाचत कौतुक करण्या म्हणते आई खुळेच आहे क्षेत्र आपुले जपण्यासाठी धडपड असते तिला…

  • पाउस सरी – “Showers of rain”

    रिमझिम झिमझिम बरसत वर्षत याव्या पाऊस सरी नाचत खिदळत अंगावरती घ्याव्या पाऊस सरी टपोर मौक्तिक जलदांमधले स्वप्नपरी वेचीते ओंजळीतुनी नाजुक तिचिया याव्या पाऊस सरी मेघ गडगडे वीज कडकडे राग गातसे भूमी मृद्गंधाशी करीत गप्पा गाव्या पाऊस सरी प्राजक्ताचा सुवास ओला भरून देहामध्ये ओलेत्या पण चिंब भिजाव्या न्हाव्या पाऊस सरी तप्त बाष्पयुत शुभ्र मेघना थंड होतसे…

  • कविता – Poem

    कविता असुदे वाकडी अथवा सरळ किंवा वेलांटीदार वळणा वळणाची ! तिचं वाकडेपणसुद्धा कधी कधी जपावं ! तिचं सरळपण साधावं तिची मोहक वेलांटीदार वळणे आपणही घ्यावीत… वेलांटीत वाकावं, उकारात उडावं ! काना मात्र्यात टिपावं चिंब भिजलेलं मन ! मग नकळत हसावं विसर्गात अधर  किंचित वक्र करून ! कविता असतेच एक हलकी मोळी गझल वृत्तात बांधल्यास होते…

  • बिजली बाला – lightning

    मीही घडले तीही घडली तोही घडला हाही घडला … आपण घडलो घडले सारे कधी पडताना घडले मीरे दिवसा मोजीत होते तारे ! भिजवून गेले सुगंध वारे अशीही घडले तशीही घडले घडता घडता कधी बिघडले ! हमसून हमसून मीही रडले… पिंजऱ्यातले बंद हुंदके फुटल्यावरती मौक्तिक बनले नक्षत्रांची नव्हती माला नव्हता मृग अन चित्रा स्वाती ! तरीही…

  • लिहावी सुंदर गझल! – “A beautiful ghazal should be written”

    लिहावी सुंदर गझल ! सुंदर कविता, सुंदर कथा, सुंदर समीक्षा ! स्वतःसाठी! कधी दुसऱ्यासाठी ! कधी तिसऱ्यासाठी ! तर कधी सर्वांसाठी ! मोकळ्या मनाने लिहित जाल स्वतःसाठी तर आपोआपच लिहित जाल सर्वांसाठी !