Category: Marathi kaavya

  • परडी – PARADEE

    काव्यपरीचे, चरण पकडुनी, प्राप्त जाहले, सौख्याला; निंदा गर्हा, करुन स्वतःची, फक्त शरण मम, आत्म्याला.. तळ गाठाया, आत्मसागरी, उतरत गेले, खोल खरी; तटस्थ राहुन, निरखित गेले, भोवतालची, मूक दरी.. गांभीर्याने, अन धीराने, दिवा उजळिता, गाभारी; श्रद्धापूर्वक, मिटल्या नेत्री, मी जीवाची, आभारी.. भिऊन ज्यासी, बंद कवाडी, कोंडत गेले, काव्याला; ती भीती भय, सुंदर मम सय, पहा कळाले,…

  • गगन जाहले निळे – GAGAN JAAHALE NILE

    कण्हेरमाळा गळा घालुनी मूर्त गोजिरी खुले गुलबक्षीसम अंग रंगवुन सांजसमय सळसळे कृष्णकमळ कातळी उमलता जळी चंद्रमा हले गुलाब पिवळा करी सईच्या बोटांमध्ये वळे प्राजक्ताला धरून अधरी झरझर पळती पळे बकुल फुलांचा सुगंध भरुनी धूप मंदिरी जळे झेंडूचे बन सुवर्णवर्खी वाऱ्यावरती डुले चाफा हिरवा सुगंध वाटित पानांतुन हुळहुळे जास्वंदीची कर्णभूषणे घालुन सजली फुले डेलीयाच्या रंगोलीवर शेवंतीची…

  • येऊदे सय सयी तुझी – YEOODE SAY SAYEE TUZEE

    ग्रीष्म बहरता कात टाकुनी, येऊदे सय सयी तुझी हृदयाला गदगदा हलवुनी,  येऊदे सय सयी तुझी सय आल्यावर भय थरथरते, गारांसम ते कोसळते ओंजळीत हिम शुभ्र झेलुनी,  येऊदे सय सयी तुझी निश्चल काया नयनी वादळ, अधर तरीपण मुके मुके मस्त मोकळे धुंद बरसुनी,  येऊदे सय सयी तुझी येच तारके पृथ्वीवरती, बनून अशनी वा उल्का त्या शिलांचे…

  • जमीन सुंदर – JAMEEN SUNDAR

    गझलेमध्ये, शेर असावे, किमान तरिहो पाच; रदीफ नसला, तरी चालते, काफिया पण हवाच. सूर ताल अन, लय सांभाळत, गझलीयत येताच; वृत्त असूदे, लाख देखणे, वृत्तीचा का काच? अलामतीला, जो जपतो तो, तोच काफिया खास; पकडाया लय, करून गुणगुण, करा मनातच नाच. मतला म्हणजे, जमीन सुंदर, पहिला बब्बर शेर; फुलवाया गण, अक्षर मात्रा, कधी न घेई,…

  • गंडोला – GANDOLAA

    फिरतो घुमतो तो गंडोला नको बावरू तू चंडोला पाय रोवुनी पकड गजाला करीत किलबिल बघत हिमाला येता थांबा हळू उतर रे पंख धवल तव उडत पसर रे गाठ मंदिरा निळ्या अंबरी स्वागत करतिल मरुत सुंदरी पिंड शिवाची बर्फामधली तुझ्याचसाठी सजली हसली नाद अनाहत अनुभूतीचा भरल्या हृदयी ऐक खऱ्याचा ब्रम्ह दर्शना साठव नेत्री परतून ये मग…

  • कोण – KON

    गडगड गगनी हसतो कोण नभात मोती दळतो कोण ढगात कापुस भरतो कोण घनामधूनी झरतो कोण पहाट फुलता वाटत मोद फुलांमधूनी हसतो कोण निळ्या समुद्रा भेटायास नदीत लाटा भरतो कोण अंधाराला भेदायास विजेस लखलख म्हणतो कोण जहाज गलबत हलवायास शिडात वारा भरतो कोण वळीव येता भिजावयास चल चल मजला म्हणतो कोण मात्रावृत्त – (८+७=१५ मात्रा)

  • पाखरां भरवेन मी – PAAKHARAA BHARAVEN MEE

    पाखरां भरवेन मी जीवना फुलवेन मी शिंपल्यात पडूनिया मौक्तिका घडवेन मी वीज देही नाचता अंबरी तळपेन मी उगवण्या पुण्यांकुरा मृत्तिका भिजवेन मी जतन करण्या प्रीतिला शुद्धता घडवेन मी वृत्त – गा ल गा गा, गा ल गा.