-
सुंदर सुंदर – SUNDAR SUNDAR
आज दिवस सौख्याचा सुंदर उजळुन जाईल मनीचे अंबर किणकिण मंजुळ गाईल झुंबर हसेल मम नेत्रांचे मंदिर सर पुण्याची येईल सरसर पापांची मग मिटेल घरघर शुद्ध सरींनी भिजेल अंतर निसर्ग गाणे म्हणेल सुंदर सुंदर सुंदर अतीव सुंदर
-
कान-कावळा – KAAN-KAAVALAA
कधी कधी मी टांगेवाली कधी कधी अन भांडेवाली भांडेवाली मी नखर्याची करे धुलाई हर पात्रांची कधी डोईवर घेउन हारा विकते भांडी दारोदारा सुबक ठेंगणा लठ्ठ सावळा तेल भराया कान-कावळा तेलाने जेंव्हा कळकटतो जोर लावुनी घास घासते धरुन नळाच्या धारेखाली स्नान घालते त्यास सकाळी तयात ओतून गोडेतेला नीट ठेवते वरी टेबला बांधुन बुचडा मग केसांचा फडशा…
-
दिसू लागला – DISOO LAAGALAA
दिसू लागला स्वच्छ किनारा ध्वज फडफडणारा दिसू लागला शांत किनारा बेटावर किल्ला दिसू लागला बुरूज दगडी माडांची वाडी दिसू लागल्या काजू बागा करवंदी मेवा पाण्यावरचा तरंग इथल्या गात पुढे जावा हरेक अधरांवरती वाजो हृदयातिल पावा जीव येथल्या मातीमधला मोक्षाला जावा प्रेमामध्ये सौख्यामध्ये चिंब चिंब न्हावा
-
विश्वचि अवघे माझे – VISHVACHI AVAGHE MAAZE
पानापानावर तरुणांनो लिहा स्वतःची गाणी आठवणींची फुले निरागस फ़ुलतिल पानोपानी दोनच पानामध्ये लपुनी कळ्या पाहती बागा फुलण्यासाठी तापतापुनी कधी न करिती त्रागा ऋतू कोणता आहे त्यांना घेणेदेणे नाही उमलुन येती हृदय उमलता बोलत काहीबाही सहज चुंबितो गूज सांगतो शीळ घालतो वारा अंबरातुनी रातराणिला साद घालतो तारा माझे माझे म्हणू कशाला विश्वचि अवघे माझे पुनव अमावस…
-
नदी फुलांची – NADEE FULAANCHEE
रंगबिरंगी नदी फुलांची वहात आहे काठावरची हिरवाई ती पहात आहे बुडी मारुनी पुष्पांमध्ये बुडून जावे अश्या आगळ्या विचारात मी नहात आहे निळसर कुसुमे दाट निळेपण कुठे चालले शुभ्र गुलाबी बुके त्यातही वहात आहे तशीच काही तरल गझल मम मनात माझ्या बनून कविता पुढे पुढे बघ वहात आहे …
-
असी मसी अन कृषी – ASEE MASEE AN KRUSHEE
मंत्र हाच या सहस्त्रकाचा असी मसी अन कृषी माणसातले देव शोधती मुनी आणखी ऋषी शास्त्र लिहावे काव्य सुचावे जमीन कसावी अन रक्षावी कन्या माता बहिणींसाठी घरकुल आणिक बाग असावी पिता पुत्र अन बंधू सारे या भूमीचे पिऊन वारे देशासाठी एक होऊया लोकशाहीला टिकवूया मित्र मैत्रिणी करू एकजुट शुद्ध भावना मनात बळकट स्वतंत्र भारत सुवर्ण भूमी…
-
प्रश्न मंजुषा – PRASHN MANJUSHHAA
मी लिहिते अगदी सहज सहज लिहिते कसं लिहू काय लिहू? म्हणत म्हणत लिहितेच लिहिते कारण… असं सहज सहज लिहायलाच मला खूप आवडतं पण मला काय माहीत की, मी जे लिहिते त्यात असतात; कोणाच्या काहीबाही प्रश्नांची उत्तरे ! मग तयार होते माझ्याही मनात एक भलीमोठी प्रश्न मंजुषा! मग मीच वाट पहात बसते माझ्या तसल्याच अगदी सहज…