Category: Marathi kaavya

  • धिंगाणा – DHINGAANAA (razzle)

    पुन्हा पुन्हा यावी दारी पावसाची सर चिंब चिंब व्हावे पुन्हा मन सैरभैर अंगणात चिमण्यांनी धिंगाणा घालावा आई आई म्हणताना जीव वेडा व्हावा येशीलका आई घरी होउनीया परी दादांसवे गप्पागोष्टी करावया घरी रांधेन  मी तुझ्यासाठी मऊ भात खीर दादांसाठी लढावया होईन मी वीर आई दादा कुठे आता असाल जगात जिथे आहे तिथे तुम्ही असाल सुखात…

  • मी जेंव्हा लहान होते – MEE JEVHAA LAHAAN HOTE (“when I was a child”)

    मी जेंव्हा लहान होते; तेंव्हा आईसुद्धा लहान होती माझ्यासारखीच दादांसाठी भाजीभाकरी करीत होती… आई जेंव्हा परी होती चित्रासारखी सुंदर होती! तेंव्हाच मी शिकले… चित्र काढायला आणि दादा शिकले चित्रात रंग भरायला आणि भाऊ बहिण शिकले खदखदून हसायला हा! हा! हा! मग आई शिकली वाचायला आणि लिहायला, गायला… मग जेंव्हा आई गोष्टी लिहायला लागली तेंव्हा दादा…

  • अजूनही ती – AJOONAHEE TEE (“she still”)

    अजूनही ती..  मजला जपते….. अडखळता मी उंबरठ्याशी… हात देउनी मज सावरते अजूनही ती मजला जपते गाठी घालित आणिक आवळीत बसते जेव्हा शल्य मनातिल हळूच शिरते बोटांमध्ये उकलुन गाठी मन उलगडते अजूनही ती मजला जपते… तिचे सजवणे घास भरवणे आठवताना मन झरझरता नाजुक साजुक बोली बनते अश्रुंसंगे बोलत बसते पापण काठी बांध घालते अजूनही ती मजला…

  • संपदा घेऊन ये – SAMPADAA GHEOON YE (“come with prosperity”)

    रंगल्या पूर्वेसवे तू रंग ते लेऊन ये कोवळ्या किरणांसवे तू संपदा घेऊन ये गातसे आकाश गझला पंख तू पसरून ये कुंकवाला शुभ्र भाळी आज तू रेखून ये कैद करण्या शृंखला या ठेवल्या नाहीत मी थांबली गाडी जरी ना साखळी खेचून ये येच उल्के भूवरी या बहरण्या फुलण्या गडे वाटली ‘भीती’ जरी ‘तिज’ अंबरी फेकून ये…

  • होतसे मी क्रुद्ध आता – HOTASE MEE KRUDDH AATAA

    होतसे मी क्रुद्ध आता जाहले बघ वृद्ध आता शब्द पुद्गल जाणते मी पेटवीती युद्ध आता शब्द आतुर बोलण्या पण कंठ का अवरुद्ध आता रंगले मन रंग उधळुन कोण येथे शुद्ध आता नांदता चित्तात शांती भासते मी बुद्ध आता वृत्त – गा ल गा गा, गा ल गा गा.

  • गाडी – GAADEE (vehicle)

    मी पाहते मला अन सुटते सुसाट गाडी मी वाचते तुला अन बनते विराट गाडी डब्ब्यात बैसलेले सारेच शब्द वेडे शेरात कोंबता मी होते पिसाट गाडी घेताच वेग चाके गगनात धूर ओके ओझे कितीजणांचे ओढे मुकाट गाडी मस्तीत शीळ घाले वळवून देह डोले जो नियम पाळतो त्या देतेच वाट गाडी जोडून लाकडांना बनली नवीन बग्गी दौडे…

  • मृगजळ – MRUGAJAL (mirage)

    हाय! मी वेडी किती रे रंगले  त्या मृगजळी चुंबिले प्रतिमेस भ्रामक दंगले त्या मृगजळी शिल्प कोणा प्रेमिकांचे घडवितो शिल्पी कुणी बनविता कैदी तयाला भंगले त्या मृगजळी बेरकी होत्याच वृत्ती वृत्त होते नेटके अर्थ पण फसवे परंतू संपले त्या मृगजळी यक्षही नावेत होते जादुई खुर्च्या तिथे चिकटले खुर्च्यांस जे जे गंडले त्या मृगजळी गझल सच्ची घेउनी…