-
सम्यक मोळी – SAMYAK MOLEE
तीनच ओळी सतरा अक्षरांची सम्यक मोळी बांधूया झोळी लाटुया जाळीदार पुरणपोळी मूर्ती प्रक्षाळू दशलक्षण धर्म गुणांचा पाळू
-
टपोऱ्या गारा – TAPORYAA GAARAA
सहज सोपे आवडले हाइकु नकोच जोखू गोडवा राखू एवढ्या तेवढ्याने नको भडकू नको तडकू गुलाबजल शिम्पू भेगांना झाकू लाव तंबोरा जुन्या आठवणींच्या जुळव तारा समुद्र खारा आपल्यासाठीच हा मोसमी वारा चढता पारा वळिवाचा पाऊस टपोऱ्या गारा वादळ झेल हरतेस कशाला त्याच्याशी खेळ प्रेमच प्रेम भिंतीवर बसली फोटोची फ्रेम रसाळ गोड घोलवडचे चिक्कू कशाला विकू खास…
-
हाइकु – HAIKU
ऐक हाइकु लिहीन म्हणते मी सात हाइकु रचे हाइकु सुगरण बायकू गुणाची काकू जरी वाटते अवघड हाइकु घाबरू नकु लिहू हाइकु कवितेच्या अंगणी आपण टिकू एवढे करू लिहिताना हाइकु सत्यच बकू हाइकुसाठी वेळात वेळ काढू थोडेसे चुकू प्रयत्न करू हाइकुत हाइकु छान हुडकू
-
तरूतळी – TAROOTALEE
या स्थळी तरूतळी स्वच्छ सुंदर झोपडी धरी शिरी सावली गर्द झुंबर झोपडी झुलतसे बाळ गुणी पांघरोनी गोधडी अंगणी सई विणे अंगडी अन टोपडी लिहित बसे गोप कोणी उघडुनी चोपडी दूर तिथे बोलण्यात दंगलेली चौकडी नगरजन नित्य येती वाट करुनि वाकडी
-
काया अनमोल – KAAYAA ANAMOL
प्राजक्ताचे देठ जणु, ओठ तुझे जर्द बाई, ओठ तुझे जर्द गुलाबाच्या फुलापरी, गाल तुझे लाल बाई, गाल तुझे लाल बागेतल्या भृन्गासम, कृष्ण तुझे नेत्र बाई, कृष्ण तुझे नेत्र सावळ्या या मुखावरी, चाफेकळी नाक बाई, चाफेकळी नाक कुंडलात शोभणारे, कान तुझे छान बाई, कान तुझे छान श्यामरंगी घनापरी, केस तुझे दाट बाई, केस तुझे दाट पौर्णिमेच्या…
-
ट चे गाणे – TA CHE GAANE
ट ट टमटम म्हणतेय कम कम टा टा टाटा दावतेय वाटा टि टि टिमकी भलतीच खमकी टी टी टीका करायला शिका टु टु टुकटुक बास झाली चुकचुक टू टू टूम पळाली धूम टे टे टेकू लावायला शिकू टै टै टैया अगो बैया बैया टो टो टोप जा आता झोप टौ टौ टौका डोलतिया नौका टं…
-
गीत – GEET
गीत गावे लिहिता लिहिता ते रचावे गाता गाता भाव भरण्या त्यात सुंदर पांघरावे नील अंबर अंबरातिल मेघ झरता ते रचावे गाता गाता अर्थ तो जाणून घ्यावा गोड ही मानून घ्यावा पाहण्याला त्यात आत्मा ते रचावे गाता गाता गीत गावे लिहिता लिहिता ते रचावे गाता गाता