Category: Marathi kaavya

  • उरेन मी – UREN MEE (I will remain)

    जे मला पटेल तेच करेन मी जाळुनी पूरून हाव उरेन मी तूच बेजबाबदार नको म्हणू सांडली तशीच प्रीत भरेन मी पोहताच कालव्यात रुबाब का? सागरात भोवऱ्यात तरेन मी तू तुझा अहं गडे कुरवाळिशी जिंकताच ‘मी’पणास हरेन मी कागदी फुले जरी चुरगाळिली आजही बनून दुःख झरेन मी आठवांस त्या सुरेल अजूनही कोंडुनी रचून गीत स्मरेन मी…

  • ब्रीद -BRID ( good task,aim)

    मतदानाला जाऊ सारे निघा घरातुन बाहेर मतदानाचे केंद्र सुरक्षित जणू साजिरे माहेर प्रातःकाळी उठून सगळी कामे करुया भरभर केंद्रावरती गर्दी होता रांगा लावू झरझर आठवणीने घेउन जाऊ ओळखपत्रे खरीखुरी मतदानाचा हक्क बजावुन आनंदाने येऊ घरी नको गुलामी पाय चाटणे स्व-अभिमानी बनू बरे अंधश्रद्धा पूर्ण उखडणे हे तर माझे ब्रीद खरे

  • माझे अडखळणे – MAZE ADAKHALANE (my stumbling)

    जितुके दाहक तितुके मोहक माझे अडखळणे म्हणती साधक नसते बाधक माझे अडखळणे हळव्या कातर समयी भावुक प्रेमीजन म्हणती हटके राजस करते पातक माझे अडखळणे जल काचेतिल प्रतिबिंबासम काया झुळझुळता झुलते झुंबर हलता लोलक माझे अडखळणे वचने पेलुन शपथा झेलुन सांधे कुरकुरता बनते नाजुक असली नाटक माझे अडखळणे करण्या सावध मजला पाडुन पाणी खळबळता भलते साजुक…

  • पोट भराया येतो घरला – POT BHARAYA YETO GHARALA ( I come home to fill my stomach)

    पोट भराया येतो घरला गोड धोड मज नको नको वाढ भाकरी चतकुर अर्धी हाड हाड तू करू नको करून योगा स्लीम जाहलो रोड रोड तू म्हणू नको जरा गोबरे गाल जाहले जाड जाड तू करू नको झोपूदे मज तप्त दुपारी वाड वाड  तू बकू नको फळी हलवुनी भांडीकुंडी धाड धाड तू पाडु नको पत्र प्रियेचे…

  • सुंदर सुंदर – SUNDAR SUNDAR (so beautiful..)

    आज दिवस सौख्याचा सुंदर उजळुन जाईल मनीचे अंबर किणकिण मंजुळ गाईल झुंबर हसेल मम नेत्रांचे मंदिर सर पुण्याची येईल सरसर पापांची मग मिटेल घरघर शुद्ध सरींनी भिजेल अंतर निसर्ग गाणे म्हणेल सुंदर सुंदर सुंदर अतीव सुंदर

  • कान-कावळा – KAAN-KAVALA (container of edible oil)

    कधी कधी मी टांगेवाली कधी कधी अन भांडेवाली भांडेवाली मी नखर्याची करे धुलाई हर पात्रांची कधी डोईवर घेउन हारा विकते भांडी दारोदारा सुबक ठेंगणा लठ्ठ सावळा तेल भराया कान-कावळा तेलाने जेंव्हा कळकटतो जोर लावुनी घास घासते धरुन नळाच्या धारेखाली स्नान घालते त्यास सकाळी तयात ओतून गोडेतेला नीट ठेवते वरी टेबला बांधुन बुचडा मग केसांचा फडशा…

  • दिसू लागला – DISU LAGALA (became visible)

    दिसू लागला स्वच्छ किनारा ध्वज फडफडणारा दिसू लागला शांत किनारा बेटावर किल्ला दिसू लागला बुरूज दगडी माडांची वाडी दिसू लागल्या काजू बागा करवंदी मेवा पाण्यावरचा तरंग इथल्या गात पुढे जावा हरेक अधरांवरती वाजो हृदयातिल  पावा जीव येथल्या मातीमधला मोक्षाला जावा प्रेमामध्ये सौख्यामध्ये चिंब चिंब न्हावा