Category: Marathi kaavya

  • श्याम सुंदर सावळा – SHYAAM SUNDAR SAAVALAA

    माळ गुंफण्या पोवळा घर बनविण्या ठोकळा खाण्यासाठी ढोकळा घाऱ्या करण्या भोपळा खीरीसाठी कोहळा तुरट आंबट आवळा गोड मोर-आवळा बाळ मनाचा मोकळा श्याम सुंदर सावळा

  • आले वर्ष नवे आले – AALE VARSH NAVE AALE

    आले वर्ष नवे आले आले वर्ष नवे आले… रवि किरणांचा कनक पिसारा उजळुन टाकी परिसर सारा फुलवित शेत मळे… पुष्प सुगंधित बाग जाहली चिंता साऱ्या मिटवुन फुलली मोजित  घटका आणि पळे… आले वर्ष नवे आले आले वर्ष नवे आले…

  • नाताळ – NAATAAL

    येणार नाताळ नाताळ सुंदर झालंय आभाळ देऊया भेटी नाजूक नाती जपण्य़ा साजूक नाताळबाबाशी बोलूया मजेत गाणी गाऊया

  • अमीर – AMEER

    मम हृदयी तू भगवंता होना आता स्थीर अंतर्यामी वाहूदे शुद्ध भक्तिचे नीर क्षीरोदधिच्या स्नानाने धवल होउदे धीर तूच औषधी आतारे मिटवाया मम पीर तप करुनी मी ज्ञानार्थी सोडत आहे तीर झेलायाला उभे इथे कषाय त्यागुन वीर चरू म्हणूनी मी अर्पे शब्दफुलांची खीर तीर्थंकर हे नाम तुझे पायाशी तसवीर हस्त जोडुनी ठेवावी घडीव सुंदर चीर पंचइंद्रिये…

  • भीत नाय मी कुणास – BHEET NAAY MEE KUNAAS

    सोक्ष मोक्ष लावण्यास भीत नाय मी कुणास पूर्ण सत्य सांगण्यास भीत नाय मी कुणास लोटुनी पुरात नाव लाट पोट फाडण्यास भोवऱ्यास भेदण्यास भीत नाय मी कुणास कुंडल्या बनावटी करून कैक छापतात त्या चुलीत जाळण्यास भीत नाय मी कुणास माझियात मनुज देव हडळ भूत राक्षसीण हे त्रिवार बोलण्यास भीत नाय मी कुणास मंगळात आगडोंब सांगता कुणी…

  • हलवा – HALAVAA

    काटेरी मोहक हलवा नाजुकसे जडाव घडवा गझलेच्या तनुवर सजवा प्रेमाने नाती जुळवा वचनांनी सुंदर हसवा अंगणी झुलावा झुलवा ताटवा फुलांचा फुलवा काव्याचा भरुनी गडवा अंतरे प्रीतिने सजवा डोईवर कळसा चढवा

  • गझलानंद – GAZALAANAND

    त्रिशंकुची चार टोके, असतिल ज्याच्या पृष्ठावरती, अशा गोलकाच्या मी केंद्री, झुकविन माथा अनंत वेळा! अविनाशी आत्मियाशी, भांडुन तंटुन थकल्यावरती, शांत मनाने बसेन तुझिया, चरणी नाथा अनंत वेळा! ढोल तबला सुरपेटी, हीच साधने ग्रामजनांच्या, देइन हाती मैत्री करण्या, सूर ताल अन लय शब्दांशी; नृत्य संगीत शिकाया, बडवित टिपरी टिपरीवरती, ऐकत राहिन आत आतला, तै तै था…