Category: Marathi kaavya

  • करवली – KARAVALEE

    कुंकू हळदी, नेसुन शालू, झाले वरमाई! गुंजत आहे, कानामध्ये, मंजुळ शहनाई! मांडव दारी, तोरणात बघ, आंब्याची  पाने! प्राजक्ताला, सांगत आहे, सुगंध फुलजाई! पिता वराचा, स्वागत करण्या, फेटा बांधुन उभा! दिल्या घेतल्या, आनंदाची, करण्या भरपाई! लेक करवली, घेउन चाले, दीपज्योत हाती! राजस सुंदर, लेक हासरा, हसते हिरवाई! वधू सुंदरी, गुणी लाजरी, करात वरमाला! ऐक अंबरा, उधळ…

  • आयुष्यावर – AAYUSHYAAVAR

    प्रेम करायचे असते बघ आयुष्यावर ओझे नसते बनायचे बघ आयुष्यावर आयुष्याचा हिशेब नसतो मांडायचा आठवणींचा अल्बम असतो जपावयाचा आयुष्यावर म्हणुन लिहावी सुंदर गाणी त्यात भेटते आपल्यामधली कुणी दिवाणी म्हणायचेना अशी दिवाणी असा दिवाणा प्रेमामध्ये समान सारे नसे बहाणा नुसते तू तू नुसते मी मी रोग मनाचे मीपण तूपण पथ्यापुरते जपावयाचे मीपण बघण्या वेळ जरासा मनास…

  • एक करंजी – EKA KARANJEE

    एक करंजी खूपच रुसली कढईमध्ये बघ धडपडली चिडून कढई तिथून उठली चुलीवरी अन जाऊन बसली कढई मग तेलाने भरली फूंक मारिता चूल पेटली तेलालाही उकळी फुटली ताप तापुनी उकळ उकळली शुभ्र करंजी तयात फुगली बघून झारा खुदकन हसली थाळीमधल्या जळात पडली मासोळीसम त्यात पोहली बाळोबाने तिला उचलली चोखुन चावुन गिळुन टाकली

  • पंचप्राण मम जाहले – PANCHAPRAAN MAM JAAHALE

    पंचप्राण मम जाहले, पंचभुतांवर स्वार। जिनवाणीला प्राशुनी, करेन हा भवपार। विषय वासना भावना, छळोन मजला फार। धरेन भगवन मस्तकी, शुद्ध भक्तिची धार। खरेपणाचे शस्त्र हे, परजिन त्याची धार। मिथ्यात्वावर घातकी, चालवेन तलवार। हृदय मंदिरी मूर्त ही, गळ्यात मौक्तिक हार। स्वागत करण्या प्रीतिचे, सदैव उघडे दार। मात्रावृत्त (१३+११= २४ मात्रा)

  • आठवण – AATHAVAN

    Aathavan means memory. Here poetess tells us about her sweet memory. तुझी म्हणाया नको वाटले म्हणून तिजला निळी म्हणाले निळी जाहल्यावरती तिजला किती किती तू खुळी म्हणाले खुळी जाहल्यावरती वेडी सैरावैरा पळू लागली आवरता तो नाच तिचा मग गात्रे माझी थकू लागली आठवण जरी ती तुझीच होती कैक आठवणी गाऊ लागल्या रंगबिरंगी हार बनूनी गळ्यात…

  • जयमाला – JAYAMAALAA

    जय रमणी मन हरिणी गुणवर्धन जननी तव उदरी  नव नगरी रत्नत्रय खाणी तू दुहिता झुळझुळता तेजोमय सदनी मृदु निश्चय व्यवहारे जाणिशि नय दोन्ही दल अधरी क्षिर झरुनी फुलते ही सृष्टी घट गवळण भरभरुनी करते बघ वृष्टी घन अंबर तन झुंबर सळसळतो अग्नी मंजुळ रव नीतळ दव जल आरसपानी शशधर तो अघहर श्री धरितो  शक्तीला सत…

  • इंजिन – INGIN

    आगगाडीचे इंजिन धावे रुळावरुनि या डौलाने मोहक वळणे पार कराया सहज लीलया वेगाने निळ्या अंबरी शुभ्र घनांची माळ फिरे बघ स्वैर पणे झुकझुक झुकझुक नाद जागवी मनी-मानसी गीत जुने