Category: Marathi kaavya

  • बारमास गीत – BAAR-MAAS GEET

    चैत्रात उधळे नाविन्य कोणी वैशाख खोदतो कांचन खाणी ज्येष्ठोबा गातो पावन गाणी आषाढ दिक्पाल रावण मानी रंगात भिजणार श्रावण राणी भादवा हासतो जिंकुन ठाणी धान्याच्या भरेल आश्विन गोणी दिव्यांनी सजणार कार्तिक वाणी मार्गशीर्ष बांधे तोरण पाणी पौषात लुटावी गुलाब दाणी माघात लाघव लावण्य मौनी सुनेत्रा रंगीत फाल्गुन सोनी मात्रा-अठरा(१८)

  • जाळीतुनी धुक्याच्या – JAALEETUNEE DHUKYAACHYAA

    जाळीतुनी धुक्याच्या सुप्रभात पाऊले टाकी तिज भास्कर चाहुल देतो उठवीत दिशांना दाही किरणशलाका हळदी प्राचीवर कुंकुम उधळे मेघना मुग्ध बाला तलम ओढणी घेते घाटांची मोहक वळणे नववधू जणू सजणी दागिने फुलांचे ल्याली नाकात वेलीची नथनी झुळझुळे खोडकर ओढा काठावर हिरवी राने पाण्यावर नीतळ शीतल सोनेरी झुकती किरणे सूर्याला वंदन करती पोपटी कोवळी पाने वाहतो सुगंधी…

  • कामाचा पाढा – KAAMAACHAA PAADHAA

    काम एके काम काम दुणे दाम काम त्रिक राम काम चोक साम कामा पाचे प्रीती काम सख रीती कामा सत्ते ज्योती कामा आठे स्नेह कामा नव्वे प्रेम काम दाहे देह कामा आकरे स्वार्थ कामा बारे परमार्थ

  • पहाट गाणे – PAHAAT GAANE

    भाळावरी नभाच्या, पूर्वेस चंद्रकोर; जाळीतुनी ढगांच्या, हसते सकाळ भोर. गाई भारद्वाज, त्याचे पहाट गाणे; फुलली प्रभात हसरी, नाचे मनात मोर.. चारोळी-मात्रा,तेवीस(२३)

  • श्रावणा रे – SHRAAVANAA RE

    श्रावणा रे शिंप झारी पंचमीला आल्या पोरी देऊळात राऊळात मंदिरात रागदारी सोनसळी ऊन झरे कौलारू या घरांवरी कंकणे तू भर बयो कासारीण आली घरी अंगणात गुलबक्षी दवबिंदू जुईवरी पाखरांचा दंगा चाले जास्वंदीच्या फांदीवरी रंगभोर इंद्रधनू आभाळाच्या भाळावरी नाचू गावू फेर धरू फुललेल्या भुईवरी

  • घाई करा घाई – GHAAEE KARAA GHAAEE

    In this poem the poetess describes happy atmosphere of marriage ceremony. विहीणबाई व्याहीबुवा घाई करा घाई लेक माझा राजबिंडा हवी सूनबाई भरजरी शालू आणि डाग सोनियाचे गळ्यामध्ये घालायाला सर मोतियांचे लेक माझी करवली शुभ्रगुणी जाई नातसून बघायला माय आतूरली भेटीगाठी होता होता मने सुखावली कौतुकाची उधळण हसे ठायी ठायी शाही मंडपात जोडी शोभणार अशी गुंजणार…

  • आला पाऊस पाऊस – AALAA PAAOOS PAAOOS

    In this poem the poetess describes the atmosphere in rainy season. In rainy season farmers are very happy. They do their work happily. They love animals in the farm like their kids. आला पाऊस पाऊस नको तू भांडूस भांडूस बांधूया छप्पर गाईस देऊया बाटूक पाड्यास निवारा करूया बैलांस मांडव घालूया वेलींस पोती धुवूया ओढ्यात वाळवू…