Category: Marathi kaavya

  • झनक ठुमक – ZANAK THUMAK

    झनक ठुमक ताल ठेका पाऊले पहा लयीत लय सूर ठेका पाऊले पहा बांबु बन डुले हले मेघ फुलोरा झुले केवडा सुगंध ठेका पाऊले पहा ललल ललल गाल गागा गागागालगा लगावला मस्त ठेका पाऊले पहा तरुण वरुण वीज वारा झुलते नभ धरा भावले ढगांस ठेका पाऊले पहा गात सुनेत्रा तराणे नाचे अंगणी नयन हस्त चरण ठेका…

  • अडिग – ADIG

    डबडबुनी दो सुकण्ण डोळे भरून आले मायाळू मन मानस भोळे भरून आले मी शब्दांचा कीस पाडुनी अर्थ गाळला कैक काफिये रदीफ गोळे भरून आले कंप लहर की थरथर नवथर लवलव न्यारी मुखचंद्रावर थबथब पोळे भरून आले कलम निर्झरी काळी शाई टपोर अक्षर चुरगळलेले कागद बोळे भरून आले क्षितिजावरती समुद्र चाचे मौनी बाबा सागर तीरी घन…

  • समयसार – SAMAY SAAR

    समयसार का सार निश्चय नय व्यवहार देव शास्त्र गुरु धार भव सागर कर पार अंतर्मन की सुनो बाते बारंबार स्वधर्म खुद का जान खुदको खुदही तार अर्थ सुनेत्रा सार्थ पर से कभी न हार

  • पाहुड – PAAHUD

    जखमा उरातल्या त्या होत्या जरी सुगंधी मम जाण अंतरीची आहे खरी सुगंधी म्हणतात पुष्प प्रेमी आकर्षणास प्रीती प्रीतीत मोह जादा असते दरी सुगंधी तांब्यातल्या जलाची तपताच वाफ झाली शीतल झुळूक स्पर्शे आल्या सरी सुगंधी मागेल मोल करणी पंचायती कुळांच्या कुंदन मण्यात काळ्या धन घागरी सुगंधी पावास चीज लोणी तडका तमालपत्री मिसळीसवे कटाची शाही तरी सुगंधी…

  • श्रीमती – SHRIMATEE

    धबधब्यात सांडव्यात छात्र नाहले तैलधार जोगव्यात क्षात्र नाहले बनविण्या गुलाब जाम पाक साखरी शहर गावच्या खव्यात पात्र नाहले बघ बरी लगावली डब्यास उघडण्या सरबती गहू रव्यात मात्र नाहले अवस भाव भोर चिंब दाटता उरी घन अमीर काजव्यात गात्र नाहले सान पोर ती कुवार अर्थ श्रीमती चांदण्यात चांदव्यात शास्त्र नाहले

  • विरासत – VIRASAT

    उडवित रंगा अवखळ दंगा कशास पंगा गझल बाई मी कट्यार नंगी झळकत अंगी तळपत जंगी नवल बाई मी मातृ पितृ मम धर्म प्रिय खरा कमळ फुलांचे सुटूदे सत्त्वर अनवट कोडे पायी जोडे करात तोडे तरल बाई मी लीड घेतले सन्मानाने जगण्यासाठी वाण वसा जैन जिनवर अंबर शिवमय सुंदर सत्य धरोहर सरल बाई मी गरगर फिरती…

  • नोंदणी – NONDANI

    विसरतेस जेव्हा कधी ओढणी तू रुमालास करतेस जल गाळणी तू पुरे जाहल्या चौकशा पोलिसी रे तपासून घ्यावी प्रुफे नोंदणी तू जुन्या पुस्तकांना पुन्हा चाळ थोडे कळायास संदर्भ झटक मांडणी तू घरातील खोल्या कवाडे किती ते जरा लक्ष घालून खडा हो झणी तू सुनेत्रा तुझे दोष गुण ओळखूनी स्वतः हो स्वतःची खरी चाळणी तू