Category: Marathi kaavya

  • प्रीती – PRITI(LOVE)

    कागदी ना पुफ्फ माझी गझल तृष्णा सौरभावर तप्त झुकली अधर तृष्णा रसरसावी शेगडीतिल कोळशांवर सरकलेल्या झाकणातुन झरत तृष्णा गरगरूनी भोवऱ्यासम खुडत नुक्ते कळत नकळत टपटपावी कलश तृष्णा दे सुवर्णाला झळाळी फुलव भट्टी आग ज्वाळामालिनीतिल तलम तृष्णा का गजाने मोजता येते तग़ज्जुल.. जोडते प्रीती “सुनेत्रा” तरफ तृष्णा   `  

  • पुरुषार्थ – PURUSHARTHA(COURAGE)

    लोकापवाद ठोक साक्षीस ठेव आत्मा बघतात फक्त लोक साक्षीस ठेव आत्मा सोडून देश प्रांत येतात पाहुणे खग झुंजार माळढोक साक्षीस ठेव आत्मा जाणावयास भेद संस्कृत प्राकृतातिल नमिऊण स्तोत्र घोक साक्षीस ठेव आत्मा सम्मेद शिखरजीस निर्वाण वीस टोके अंतीम पार्श्व टोक साक्षीस ठेव आत्मा दृष्टीस माय नाव दिधले स्वतः “सुनेत्रा ” पुरुषार्थ साध्य झोक साक्षीस ठेव…

  • बुलबुल गाणारे – BULBUL GAANAARE(SINGING NIGHTINGALES)

    टेकडीच्या वाटेवर बुलबुल गाणारे  .. बुलबुल गाणारे… फांदीवर घेत ताना खळखळ गाणारे .. बुलबुल गाणारे … शिशिराची वेळ आली निरोप घेण्याची .. निरोप देण्याची … हिवसाळी उकाड्यात शिव शिव गाणारे .. बुलबुल गाणारे … दोन पाच लक्ष कोटी संगे रुपयांच्या.. संगे माझ्यासह सोनियांच्या नाण्यांसह खणखण गाणारे .. बुलबुल गाणारे … मागेपुढे चालता ठेक्याने पावले ..ऐकण्या…

  • अष्टमूली – ASHTMOOLI(A COLLECTION OF EIGHT ROOTS OF DIFFERENT PLANTS)

    कोर चंद्राची कपाळी सिद्धशैली भोर मायेची नव्हाळी सिद्धशैली डोलते आहे गडावर जिंकुनी फड माझिया कार्यास माळी सिद्धशैली कुंदनासम चिद्घनातुन वळत जाते देय दर्शन अंतराळी सिद्धशैली अक्षरांतुन जाणवे मज लक्ष्य माझे वेध घेण्या देय टाळी सिद्धशैली लक्ष कोटी चांदण्यांचे बोल अधरी अब्ज शब्दांतून क्षाळी सिद्धशैली रातराणी कुजबुजे कानी कथेच्या बघ फुलांची मांदियाळी सिद्धशैली का बघू पंचांग…

  • चमत्कार – CHAMTKAAR(MIRACLE)

    डबघाईचे दुकान माझे तरून आले डबडबुनी दो अतिशय डोळे भरून आले चमत्कार बघ कैसा झाला पंचम काली डबडे बडवत अजाण बालक वरून आले विपर्यास का कुणी करावा अर्थ लागण्या डब घालाया घासुन भांडी घरून आले एक पाहुणा जेव्हा आला मुक्कामाला डबल बेडचे सिंगल झटपट करून आले इंग्लीश हिंदी आणि कन्नड बोल “सुनेत्रा ” डबरा भरण्या…

  • सुसैनी -SUSAINEE(A PERSON WITH GOOD MIND)

    मम जीव सैनी आहे स्याद्वाद जैनी आहे माझ्यावरीच फिदा मी काव्यात चैनी आहे करवंद काळी जाळी मैनेत मैनी आहे श्रद्धा जिनायतनावर बिंबात ऐनी आहे प्रतिके अशी स्मरणीची मासा असैनी आहे दे जीवदान तयांना नवरात्र रैनी आहे छाटावया चुकांना कलदार पैनी आहे काहून घेऊ राज्या पाळीत वैनी आहे जागी सदैव “सुनेत्रा” लिहिण्या सुसैनी आहे

  • तंदुरुस्त – TANDURUST(HEALTHY)

    अभंग ओवी ….. तंदुरुस्त पाप पुण्य लोप कर्म निर्जरेने होऊदे तो जेंव्हा व्हायचा असेल तनमन जपण्या राहू तंदुरुस्त जीव जीवासाठी घालतात गस्त प्रत्येकाची व्याख्या मोक्ष मुक्तीची हो असावी निराळी पंचम या काली वाम नवं तारू उजव्या तटाला सुखरूप येता सदाचारी शांत पुत्र वामादेवी तुझा प्राणप्रिय अश्वसेन पिता शोभतो क्षत्रिय क्षेत्रपाल रक्षे भूमी इंच इंच सुखे…