-
मोतीमाळ – MOTEE MAAL
लिहावी वाटते जेंव्हा कविता .. तेव्हाच लिहावी असं काही नाही कामे करता करताही लिहावी कविता एखादी .. किंवा रस्त्यातून चालता चालताही …. लिहावी एखादी कविता.. कामे असतातच निकडीची …रोज रोजच्या जगण्याची… ती तर करायलं हवीतच आधी… त्यानंतर मग… लिहावीच एखादी मुग्ध कविता… वेळ काढून …मूड पाहून.. साठलेल्या भिजलेल्या शब्दांतून ,,उचलावेत काही शब्द…काही क्षण… आणि लिहीत…
-
जेली – JELEE
रांधली स्वतः मी कवठ गुळाची जेली कणकेस भिजवुनी निरांजने दो केली सुकवून तयांना दिवे तेवता दारी थरथरली पर्णे आम्रतरूची सारी
-
अप्पदिवो – APP-DIVO
अप्पदिवो मम अलख निरंजन नय दृष्टी सम अलख निरंजन कर्मफळे रसमय मिळवाया रत्नत्रय दीपक उजळाया व्यवहाराचा जम बसवाया मुक्तछ्न्द तम भ्रम पळवाया जीवाचा अभ्युदय व्हाया
-
विलय – VILAY
स्वर परिमल मम वेड लावतो ….. सहज वाहतो काव्यकलेतुन ….. अक्षर अक्षर वेचून मी मग….. एक गुंफते मोतीमाला…. स्वराक्षरातून नाद अंतरी उमटत जातो…. वलय वाढते…. विलय पावते काठावरती ….. तृणांकुरांवर…. दव बिंदूंसम…. ……
-
पार लेखणी – PAAR LEKHANEE
लेखणी शमा रमा कमल कुसुम ठाकले शेर चंद्रमा निशा दार जाम लागले मुक्तकात भूप तो राग गातसे कुणी साथ देश ईश्वरी पार होत हासले
-
चंद्रार्क तनु – CHANDRAARK TANU
जिनसूर्य तू जिनचंद्र तू जिनबिंब तू मम अंतरीच्या भावरंगी चिंब तू मी मोजते ना बीजपंक्ती अर्थदा आरक्तवर्णी फाकले डाळिंब तू उत्सर्पिणी अवसर्पिणी काळातल्या चंद्रार्क तनुवर सिद्धस्वरुपी टिंब तू नांदावया अंकांसवे स्वर अक्षरे काट्यांत मी जो नेसले तो लिंब तू दाटून अंतर गीत झरता भावना ग्रंथीत उरले बीजरूपी डिंब तू वाळून जाता शाकभाज्या माळवी घोळून तिखटी…
-
रूट कॉज – ROOT CAUSE
रूट कॉज काय खरे कळव बरे टाळशील तेच स्मरे कळव बरे चांदण्यात सत्य खिरे झरे उरे का भुजंग मौन वरे कळव बरे वावरात गच्च धुके गडद निळे अंतरात नाद भरे कळव बरे प्रश्न नेमका न कुणी पुसे मला पूस तोच तू मज रे कळव बरे ऐकण्यास तीच जुनी अलक पुन्हा कोण नित्य हट्ट धरे कळव…