Category: Marathi kaavya

  • रोजी रोटी – ROJEE ROTEE

    रोज थापते रोजी रोटी मोजत बसते रोजी रोटी पडुन पालथी आगीवरती ओज फुलवते रोजी रोटी कशी द्यायची चुलीसमोरी पोज शिकवते रोजी रोटी नकटे चपटे असो मापटे नोज उडवते रोजी रोटी क्षुधा शमविण्या भुकेजल्यांची बोज उचलते रोजी रोटी

  • फाग – FAAG

    आग आहे आग मी पूर्ण सुंदर राग मी छप्परांना तोलते काष्ठ मजबुत साग मी चुगलखोरी भोवता अंध म्हणती डाग मी माल कच्चा जाळण्या यज्ञ आणिक याग मी मूढता नच कोडगी अंतरीची जाग मी परिमलाने धुंदलेली मोगऱ्याची बाग मी वेगळेपण जाणते न वेंधळी न काग मी ना करे रे आजही व्यर्थ भागं भाग मी ऐक माझी…

  • पोपडे – POPADE

    चहूकडे चाललीय घाई सुधारण्याची स्वतःस आता तयां अता लागले कळाया कसे जपावे फुलास आता अता सुखाने लिहीत आहे असेच काही मने फुलाया खुडून काटे म्हणेन हृदया उधळ उधळ रे सुवास आता जुनाट कर्मांवरी उतारा मलाच पाजे जहाल साकी तयास प्राशुन झरझर लिहिते मुळी न थारा भयास आता भिजून भिंती दवारल्यावर जुने नवे पोपडे निघाले करुन…

  • ललकारी – LALKAAREE

    कशी निवडून घ्यावी नोकरी मी छान सरकारी मला रे मूड कोठे आजही देण्यास ललकारी मुलांना पाहुनी आता शिकाया नियम सृष्टीचे घराच्या परसदारी अंगणी लावेन तरकारी करांनी कैक लिहिता उमटल्या गझला करामत ही पुरे चर्चा कराला कोठल्या म्हणतात अबकारी झळांनी पेटणे नाही हिमाने गोठणे नाही जिवाने कोष विणणे ते नसावे त्यास भयकारी लिहावे नाव म्हणते कोरुनी…

  • सम्मेदशिखरजी -SAMMED SHIKHARJEE

    तीर्थंकर जिन वीस नाथ जिन मोक्षाला गेले सम्मेदशिखरजीवरून सारे मोक्षाला गेले वीस जिनांना मी माझ्या या कवणी गुंफियले … ध्रु पद अजित संभव अभिनंदन जिन सुमति पद्म सुपार्श्व चंद्र जिन .. इथे सिद्ध जाहले वीस जिनांना मी माझ्या या कवणी गुंफियले … १ पुष्पदंत शीतल श्रेयांस अन विमल अनंत धर्म शांति जिन.. इथे मुक्त जाहले…

  • शंख – SHANKH

    हा शंख बघा जो पडला रस्त्यात येता जाता फुंकतो कुणीही त्यास या शंखासम ना पुद्गल तू माणसा फुंकून पहा रे निजरुप तव प्राणाला फुलेल ठिणगी तेव्हाच झळाळत जीवा हे सत्य जाणण्या जाण तुझा तू आत्मा आत्म्याशी जुळता मैत्र आणखी प्रीती फांदीवर बसुनी कोकिळ गाणे गाती

  • आनन – AANAN

    अभ्यासाचे साधन पुस्तक ज्ञान मिळविण्या कारण पुस्तक स्वाध्यायास्तव विनम्र भावे करते हाती धारण पुस्तक दो घटकेच्या मौजेखातर नकोस ठेवू तारण पुस्तक जीव ओतुनी लिहिल्यावरती आत्मसुगंधी कानन पुस्तक बिंब दाविते ज्याचे त्याला तुझे सुनेत्रा आनन पुस्तक