-
सलील – SALEEL
पाऊस थांबलेला काठावरील गावी पंचायतीत गप्पा गोष्टीत शील गावी मतला असेल वा हा म्हणती जमीन याला ओसाड माळ बघण्या वाटे न थ्रील गावी शहरात काम नाही ना राहण्यास थारा जातात गांजलेले करण्यास डील गावी सोडून पिंजऱ्याला गेले उडून पक्षी आता न अनुभवाया तो स्वस्थ फील गावी शिवलेय तोंड वाटे प्रत्येक माणसाचे मिळते न ऐकण्या ते…
-
विसावा – VISAAVAA
डोंगराच्या पायथ्याशी घे विसावा पावसा तृप्त जल प्राशून पृथ्वी ठेव पावा पावसा तिज समुद्रा भेटण्याची ओढ होती लागली भेटली ती काय द्यावा तुज पुरावा पावसा माणसांच्या कुंडलीतिल कर्मरूपी पिंजरा पत्रिका मांडे स्वतः जो मुक्त रावा पावसा वासनांची लाट अडवुन संयमाने तापता चिंब भिजल्या मृत्तिकेचा रंग ल्यावा पावसा केस सुकवी मेघमाला लोळणारे भूवरी तूच आता ऊन…
-
टिकाव – TIKAAV
मम आत्म्यावर माझी प्रीती स्वभाव माझा नेणिवेतले आठवण्या ना सराव माझा मनापासुनी जे जे शिकले आठवेल मज सुयोग्य समयी सहज व्हावया उठाव माझा दिशादिशातुन वादळ येता पार व्हावया मला कधीही नडला नाही विभाव माझा कुटी हवेली शेत बंगला याहुन जिवलग काया माझी या जन्मातिल पडाव माझा मी न मांडला मी न मोडला फक्त पाहिला तुझियासाठी…
-
नागमोडी – NAAGMODEE
पहाटे पहाटे मला गझल भेटे पहाटेस वेडे खरे नवल भेटे निसर्गास गाणे नवे ऐकवाया पहाटे खगाला धरा सजल भेटे दवाने भिजूनी सुगंधात खिरता पहाटे गुलाबी हवा तरल भेटे ऋतू पावसाळी गडद गडद न्यारा पहाटे निळ्याशा जळी कमल भेटे नशीली तराई निशा नागमोडी पहाटे पुन्हा पण वळण सरल भेटे
-
वेणु बजाव – VENU BAJAAV
वेणु बजाव वेणु बजाव वेणु बजाव, म्हणे काळवीट वेणु बजाव ! शिकार करण्या अजिवाची, छेड तार नीट वेणु बजाव !! गूढ कळेल मूढ वळेल, कथा महाराज राज कळेल .. गाल लगाल मिळेल माळ, जोडुन सर्कीट वेणु बजाव !!! मुक्तक written by सुनेत्रा नकाते
-
नवा विषाणू – NAVAA VISHAANOO
नवा विषाणू कविवर्य केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांच्या नवा शिपाई या कवितेवर आधारित (विडंबन काव्य ) Parody Poem. नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर विषाणू आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे ! मी न जिवाणू फंगस बुरशी ; जीव न त्रस कुठलाही , पसरण्यास मज केल्या कोणी दिशा मोकळ्या दाही ? प्रचंड आहे…
-
कोरोना – KORONAA (CORONA)
सांग कशाला बोलायाचे येता जाता कोरोनावर अंतर राखुन हवे तेवढे अक्षरातुनी भिजवु अंतर स्वच्छ हात अन स्वच्छ लेखणी गाळत जाता भरभर शाई टपटप मोती उधळत जाई मेघसावळे निळसर अंबर