Category: Marathi kaavya

  • स्फटिक – SFATIK

    मोरचुदाचे स्फटिक उडाले घनमालेतुन परतुन आले मेंदीच्या गंधाचा शिरवा प्राशुन भुंगे वेडे झाले काव्याच्या किमयेने भिजल्या हृदयामधले मिथ्य गळाले खडकांवर वर्षाव करूनी त्यागुन काया मेघ निघाले झिम्मा फुगडी घालत वारा फांदीवरती पिंगा घाले

  • काळ कर्दन – KAAL KARDAN

    उषःकाल… अहा ! अहाहा ! अहा ! अहा !! उषःकालचा रंग पहा ! ऊन सावली निळ्या नभी घन… बागडते पानांवरती मन … उषःकालच्या रम्य छटा या टिपून घेताना , मीच सावली ऊन जाहले स्वतःस टिपताना …. काळ कर्दन… मांजरांच्या मध्यरात्री लिहित आहे गोष्ट ही मम पोचलेली माणसांतिल शूर मांजर उंदरांचा काळ कर्दन पोचलेली लेखणीने पेलणारी…

  • स्वहित – SWAHIT

    स्वहित … स्वहित साधुनी पुनीत झाले अंतर माझे परहित करते सहज सहज मन अंबर माझे सत्य शोधण्या मार्ग अहिंसक स्वीकारोनी स्वतःस करण्या सिद्ध कैक हे संगर माझे ओळ … उषःकाल हा सुरभित ओला पाऊस धारा मनात ओळ चाफा पिवळा भिजत धरेवर टपटपलेला म्हणतो बोल सुंदर किती सुंदर… आयुष्याचं पान असतं जणू कागदाचं पान असतं !…

  • टेच – TECH

    म्हणतात खेच बाही टळण्या बळेच काही माझेच मज मिळाले फुकटात टेच नाही पाऊस हा असाकी फुटले घडेच दाही बदलव स्वतः स्वतःला पंचांग पेच वाही प्रत्येक दिस निराळा घडते न तेच माही होईल तव अहंची लागून ठेच लाही गझलेतुनी बरसतो तो मोद वेच राही

  • हैदोस – HAIDOS

    वादळाने घातला हैदोस कारण जांभळांचे पक्व झाले घोस कारण का असा पाऊस वाऱ्या कावलेला कावण्याचे दे मला तू ठोस कारण हे असे मौनात जाती मेघ अवचित मूग गिळण्याचा मिळाला डोस कारण का बरे ते टाळताती बोलण्याला इभ्रतीचा जीवघेणा सोस कारण ही अशी फुगलीत नगरे माणसांनी जाहल्या वस्त्या नि वाड्या ओस कारण कापले तू अंतराला फक्त…

  • मध्यरात्री – MADHYARAATREE

    आयुष्य तेच नाही हे ही खरेच आहे आहे तसेच काही हे ही खरेच आहे पंख्यास एक पाते कुरकूर ना तरीही वारा बळेच  वाही हे ही खरेच आहे आवळु नको खिळ्याला ठोकून बसव त्याला त्याच्यात पेच नाही हे ही खरेच आहे अवसेस मध्यरात्री मजला धरा म्हणाली अंधार वेच राही हे ही खरेच आहे हातात येत नाही…

  • त्रस्त – TRAST

    तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची मतला माझा कुणा कधी ना पटतो दोस्ता मतला माझा माझ्यासाठी असतो दोस्ता आवडलेल्या ओळीवरती तरही लिहिते तुझा त्यातुनी विचार मजला कळतो दोस्ता असे लिहावे तसे लिहावे डोस प्राशुनी कधी न आत्मा त्रस्त तरीही विटतो दोस्ता शब्दांवर का असे कुणाची सांग मालकी नवोदितांना शब्दचोर तो म्हणतो…